अकोल्यातून प्रा.संजय देशमुख यांची उमेदवारी कायम...!
डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप बॅंक अमरावती निवडणूकीत श्री.शिवाजी नेल अग्रेसर
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
30 Nov 2022, 4:44 PM
अकोला--शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या कर्तृत्व आणि वैचारिक वारसांच्या स्मृती जपणाऱ्या व शिवपरिवाराची जिव्हाळ्याची बॅंक मानल्या जाणारी डॉ.पंजाबराव देशमुख अर्बन को.ऑप.बॕंक आता अविरोध न होता तिची निवडणूकच होणार आहे.त्यामुळे अविरोध होण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून या निवडणूकीच्या मैदानात अकोला येथील प्रा.संजय देशमुख,कामरगांवकर यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.त्यांच्यासह दर्यापूर येथील प्रा.बि.टी उर्फ बाळासाहेब गावंडे यांच्या श्री.शिवाजी पॅनेलचे १२ उमेदवार या निवडणूकीत सक्रिय आहेत.
ही निवडणूक अविरोध होत असल्याचा संभ्रम गेल्या काही दिवसांत निर्माण झाला होता. भाऊसाहेबांच्या नावाने बॅंक असल्याने तिचा सन्मान जपल्या जावा म्हणून अविरोध करण्याच्या हालचाली करणा-यांनी स्वत:च्या सोईनेच १७ उमेदवार निश्चित केल्याने अर्ज मागे घेणाऱ्या काही उमेदवारांची नाराजी झाली.त्याच असंतोषाच्या परिणामाने अविरोधाची हवा बदलली असून आता या बॅंकेची निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
सन २०२२ ते २०२७ च्या कार्यकाळासाठी १७ संचालक पदाच्या निवडणूकीसाठी ही प्रक्रिया सुरू झाली होती.११ डिसेंबरला होणाऱ्या निवडणूकीसाठी अनेक ईच्छूकांनी आपली नामांकन पत्रे दाखल केली होती.परंतू अमरावती जिल्ह्यातील राजकीय व ईतर नेते,सहकारातील दिग्गज आणि शिवपरिवारातील पदाधिकारी ही निवडणूक अविरोध घडवून आणण्याचे प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.त्यातच अनेक उमेदवारांनी नामांकन पत्रे मागे घेतली. परंतू संपूर्ण विश्वास आणि सामंजस्यपूर्ण भुमिकेतील हे प्रयत्न नसल्याने शेवटी आता ही निवडणूक ठरल्याप्रमाणे होणार आहे.यामध्ये प्रा.बि.टी उर्फ बाळासाहेब गावंडे यांच्या श्री शिवाजी पॅनेलचे प्रा.संजय देशमुख यांचेसह सर्वसाधारण मतदार संघातून १)अढाऊ शरद श्रीराम २) डॉ.गावंडे बाळासाहेब त्र्यंबकराव ३)घोंगडे भालचंद्र भीमराव ४) माहोरे सुनिल एकनाथराव ५) खांडोकार गजानन दादाराव ६) डहाळे नितीन विरेंद्र ७) देशमुख संजय भाऊराव, २५ कि.मी बाहेरील उमेदवारांमध्ये ८)गावंडे अनिल सुखदेवराव ९) बंड उमेश राजेन्द्र १०) एस.सी मध्ये प्रा.डॉ.खडसे संजय भिमराव ११) व्हीजेएनटी मध्ये प्रा.देवळे बळीराम गोविंदराव १२) महिला उमेदवार म्हणून सौ.सांगोले योगीता प्रमोद हे १२ उमेदवार कायम असून ते निवडणूक लढविणार आहेत.
Post Views: 642