नमोयुग वरीष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा संपन्न
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
21 Dec 2024, 8:16 AM
बोरगाव मंजू,अकोला : राजमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेव्दारा संचालीत, नमोयुग वरिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला. येथे बि.एस्सी. होमसायन्स (फॅशन अॅप्रल डिझाईन) डिग्री कोर्स असून या अभ्यासक्रमाचे महत्त्व, फायदे व उपयोग पटवून देण्याच्या उद्देशाने या विद्यार्थी मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी या अभ्यासक्रमाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. शहरी मुलींना विविध अभ्यासक्रमाबाबत विविध माहीती तसेच सर्व सुविधा सहज उपलब्ध होतात.परंतु ग्रामिण मुलींना मात्र विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. याच हेतुने प्रेरीत होऊन संस्थाध्यक्ष श्री. एच. कदम साहेब, श्री. विंचनकर साहेब माजी उपजिल्हाधिकारी श्री.मनोज देशमुख यांनी ग्रामीण मुलींच्या विकासासाठी व त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या म्हणून बि.एस्सी. होमसायन्स (४५०) या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरुवात केली. असेही त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. या कार्यक्रमाला विद्यार्थीनींचा भरभरुन प्रतिसाद होता. तसेच कु. मनिषा तालोट, रोहीनी इंगळे, कु.राऊत, प्रा.कविता खंडारे, श्री.विजय वाळसे यांनी सुध्दा विद्यार्थीनींना मार्गदर्शन केले. अॅड डॉ.श्री.बि.एन देशमुख, प्राचार्य यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत महाविद्यालय व अभ्यासक्रमावद्दल संपूर्ण माहिती देऊन संस्थेने ग्रामीण मुलींसाठी एक मोठी संधी उपलब्धी करुन दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्री.बि.एन.देशमुख होते. कार्यक्रमाचे संचालन स्वाती खंडारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. काजल खेतखेडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. श्रीयश मते, सौ.वर्षा सिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले.
Post Views: 34