अकोला - स्थानिक कुटा सा. तालुका अकोट जिल्हा अकोला येथील सामाजिक सांस्कृतिक कला साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी संस्था म्हणून अग्रेसर असणारी तरुणाई फाऊंडेशन ही संस्था होय.. या संस्थेला नुकताच युवक क्रीडा संचालनालयपुणे महाराष्ट्र राज्य संचालीत जिल्हा क्रीडा कार्यालय अकोला अंतर्गत संस्थेला दिला जाणारा सन 22 23 चा जिल्हा युवा पुरस्कार जाहीर झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे 1 मे 2025 रोजी सकाळी 9.00 वाजत्ता लाल बहादूर शात्री स्टेडियम अकोला येथे 1 मे 2025 महाराष्ट्र दिनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री नामदार आकाश पांडुरंग फुंडकर. आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल अकोलाआमदार हरीश पिपळे आमदार नितीन देशमुख जिल्हाधिकारी अजित कुंभार जिल्हा क्रीडा अधिकारी सतीष चंद्र भट जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी अभय डोंगरे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदींच्या उपस्थितित देण्यात येणार अ स ल्याचे कळविण्यात आले आहे पुरस्काराचे स्वरूप प्रमाणपत्र सन्मानचिन्ह शाल श्रीफळ रोख 5 0 हजार रुपये असून तरुणाई फाऊंडेशन कुटासा ही संस्था गेल्या सहा वर्षापासून पर्यावरण आरोग्य कृषी अध्यात्मिक साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक कला अभिनय आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे.. अकोला जिल्ह्यातील नवोदित तथा ज्येष्ठ साहित्यिकांना हक्काचा विचारपीठ मिळवून देण्यासाठी अकोला जिल्हा साहित्य संमेलनाची मूर्तमेळ व सुरुवात या संस्थेने केली असून आतापर्यंत सात जिल्हा साहित्य संमेलने या संस्थेने घेतली असून कलावंतासाठी युवा सांस्कृतिक महोत्सव साहित्यिकांसाठी विविध कार्यशाळा सुद्धा या संस्थेने घेतल्या आहेत.
Post Views: 71
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay