परभणीत दयावान सरकार युवा जिल्हाध्यक्ष अमित भालेराव, उपाध्यक्ष कृष्णा शिंदे व मधुकर कांबळे यांचा सत्कार
महिलांवर होणाऱ्या आत्याच्यार विरोधात सदृश्य देखावा करून जनजागृती कार्यक्रम राबविल्या बद्दल सत्कार
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
25 Aug 2024, 10:51 AM
परभणी (प्रतिनिधी हरदीप सिंग बावरी) दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. संदीपभाई निकुंभ, मराठवाडा अध्यक्ष संजयभाई गायकवाड व परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग भाई टाक यांच्या सुचने नुसार संपूर्ण परभणी शहरात फिरून दयावान सरकार परभणी जिल्हा युवा शाखेच्या वतीने आयोजित युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव व युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा यांच्या वतीने कोलकता येथील आर.जे.कर हॉस्पिटल मध्ये महिला डॉ. वर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची जी घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढून पथानाट्या द्वारे महिलांवर, मुलींवर होणारे अत्याचार विरोधात जनजागृती करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला त्या अनुषंगाने युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव, जिल्हा उपाध्यक्ष शिंदे, व हा पथानाट्य सादर करणारे परभणीची शान समई गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड करणारे नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांच्या संच यांचा दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा संपर्क कार्यालय डॉ आंबेडकर नगर, आय. टी. आय. कॉर्नर जिंतूर रोड परभणी दयावान सरकार जिल्हा परभणी व समाजहित अभियान प्रतिष्ठान, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ, रुग्णहक्क संरक्षण समितीच्या वतीने सत्कार करून त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला. या वेळी दयावान सरकार चे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे, महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचांगे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, पत्रकार सल्लागार शेख इसाक, पत्रकार संघटक हरदीप सिंग बावरी, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, अमर गालफाडे, राहुल वहीवाल, संजय घनसावंत, सचिन हटकर, अक्षय नंद, समवेत दयावान सरकार चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 49