वृत्तपत्र वितरक प्रशांत देशमुख यांची प्रामाणिकता; सापडलेले पैसे केले परत!


 संजय देशमुख  29 Nov 2021, 5:54 PM
   

अकोला  : प्रभाग क्र. 3 न्यु तापडिया नगर मधील मंडप व्यवसायिक संजय वडाळकर हे दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वा मुलाला शाळेत नेत असतांना त्यांचे पैश्याचे पाकीट ज्यात सर्व महत्वाची कागदपत्रे व 11 हजार रुपये रोख होते ते रस्त्यात पडले. हे त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी भरपूर शोधाशोध केली परंतु पाकीट न सापडल्याने ते निराश होऊन घरी परतले व सर्व आपबिती आपल्या पत्नीला सांगत असतांनाच याच परिसरातील रहिवाशी असलेले वृत्तपत्र वितरक प्रशांत पंडितराव देशमुख व त्यांचा मुलगा प्रथमेश हे दोघेही त्यांच्या घरी येवून वडाळकर यांना त्यांचे हरविलेले पैश्याचे पाकीट पूर्ण रकमेसह परत केले. आज देशात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या वृत्तपत्रांवर जो लोकांचा विश्वास आहे  तोच विश्वास व प्रामाणिकपणा वृत्तपत्र वितरक प्रशांत देशमुख यांनी दाखविल्याने त्यांचे आधार फाउंडेशनच्या वतीने आभार मानण्यात आले त्यांच्या या प्रामाणिकपणाचे सर्व परिसरात कौतुक करण्यात येत आहे. यावेळी आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष माणिक शेळके, संजय वडाळकर, किशोर ठाकरे, राहुल ठाकूर, गौरव पांडे, सुशील ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

    Post Views:  187


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व