सचिन मुर्तडकर हल्ला: आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करा
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे अप्पर पोलीस अधिक्षक यांना निवेदन
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
03 Oct 2024, 1:58 PM
अकोला : पातुर तालुक्यातील आलेगांवचे रहिवाशी असलेले पत्रकार सचिन मुर्तडकर यांच्यावर सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी सायं. ८ वा.च्या दरम्यान विवरा येथे त्यांचेवर प्राणघातक हल्ला होऊन त्यांना गंभीर जखमी करणाNया आरोपी विरुद्ध कठोर कायदेशिर कारवाई करून त्यांचेवर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्याकरीता लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात संघटनेचे साप्ताहिक वृत्तपत्र विंगचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर ज्येष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांचे नेतृत्वात अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांना निवेदन देण्यात आले.
पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने गुन्हेगार खुलेआम गुन्हे करतांना दिसत आहेत. सचिन मुर्तडकर यांच्यावरील हल्ला हा जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीचे प्रतिक आहे. विशेषत: पत्रकारावर हल्ल्यांमध्ये वाढ होत आहेत. समाजातील चुकीच्या गोष्टी उघडकीस आणण्याचे काम करणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होत असतील तर ही लोकशाहीच्या दृष्टीने एक गंभीर बाब असल्याचे माणिक कांबळे यांनी पोलीस अधिक्षक यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी गुन्हेगार सुटणार नाहीत अशी ग्वाही अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे यांनी यावेळी पत्रकार संघटनेला दिली.
यावेळी निवेदन देतांना जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, ज्येष्ठ पत्रकार माणिक कांबळे, संतोष धरमकर, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष बुडन गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष विजय देशमुख, अॅड. एम.एस. इंगळे, प्रमोद बोपटे, जिल्हा उपाध्यक्ष संघपाल शिरसाट, प्रकाश जंजाळ, क्राईम ड्युटीचे दिपक शिरसाट, अनुराग अभंग, अशोक शिरसाट,प्रसिद्धी प्रमुख योगेश शिरसाट यांची उपस्थिती होती.
यापुर्वी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव वर यांच्यावर झालेला हल्ला, त्यानंतर विदर्भाचे अध्यक्ष शंकर जोगी यांच्यावर प्राणघातक हल्ला होऊन गुन्हेगारावर कोणतीही कार्यवाही झाली नाही, पोलीस प्रशासनाचा वचक नसल्याने गुन्हेगार खुलेआम गुन्हे करतांना दिसत आहेत. हल्ल्याची चौकशी करून गुन्हेगारांना पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत दखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणा निवेदनवारे करण्यात आली.
Post Views: 95