_बुलढाणा जिल्हाधिकारी कीरण पाटील सर यांचे हस्ते जिवनरक्षक दिपक सदाफळे उत्कृष्ट आपत्ती व्यवस्थापनाने सन्मानित
पथकाचे स्वयंसेवक मयूर सळेदार,ऋषिकेश राखोंडे, मयूर कळसकार यांचाही केला सन्मान
बुलढाणा जिल्ह्य़ाचे जिल्हाधिकारी कीरण पाटील सर यांनी घेतलेल्या आढाव्यातुन खामगाव तालुक्यातील महत्त्वपूर्ण सर्च ऑपरेशनातील दोन मुलींचे मृतदेह रात्रीच शोधुन काढुन दीले तसेच देऊळगाव राजा तालुक्यातील बाप लेकाचे मृतदेह आमना नदीत 12 की.मी.चालत जाऊन शोधुन काढुन दीले या तत्पर सेवीची दखल घेऊन तसेच सध्या महाराष्ट्रात गेली 25 वर्ष झाली सातत्यपूर्ण निस्वार्थ भावनेने निरंतरपणे मानधनाची अपेक्षा न ठेवता आपत्ती व्यवस्थापनासह सामाजिक तथा जिवनरक्षकसेवा,रुग्णसेवा, निस्वार्थपणे देऊन सहा हजारांहून अधिक नागरीकांना जिवनदान देऊन मानव सेवेचा परीचय देत महाराष्ट्रासह ईतरही राज्यात नाव लौकिक असणारे मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जि.अकोलाचे संस्थापक अध्यक्ष जिवनरक्षक दिपक सदाफळे यांच्या कार्याची दखल घेऊन आज जिल्हाधिकारी कार्यालय बुलाढाणा येथे शाल श्रीफळ सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उप- जिल्हाधिकारी महसुल समाधान गायकवाड सर, तहसीलदार राहुल तायडे सर,जि.आ.व्य.अ.संभाजी पवार साहेब,उपस्थित होते आजचा दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय असा अनमोल क्षण होता ही शाबासकीची थाप पडल्याने आमचे मनोबल वाढले यामुळे जिल्हा प्रशासनाचे आभार मानत जिल्हाधिकारी महोदयांना आंम्ही कुठल्याही आपत्तींशी सेवा देण्यास कटिबद्ध आहोत असे मनोगत दिपक सदाफळे यांनी व्यक्त केले अशी माहीती जि.आ.व्य.अ. संभाजी पवार यांनी दिली आहे
![](https://i.imgur.com/g9Izmql.jpeg)
Post Views: 29