कायमस्वरूपी तलाठी नेमण्याची वानखेड च्या ग्रामस्थांची मागणी


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-12-08
   

वानखेड : वानखेड भाग 2 सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार भाग एक सजेचे तलाठी सौरभ लेंभे यांचेकडे देण्यात आलेला आहे  तलाठी  येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्काळ कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी वानखेड ग्रामस्थानी केली आहे.
ठळक मुद्दे
१जानेवारी पासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.
वानखेड : वानखेड भाग 2सजेसाठी गेली वर्षभर तलाठी उपलब्ध नसून या सजेचा अतिरिक्त कार्यभार भाग एक सजेचे तलाठी सौरभ लेंभे यांचेकडे देण्यात आलेला आहे मात्र तलाठी  येथे उपस्थित राहत नसल्यामुळे ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत असून तात्काळ कायमस्वरूपी तलाठी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी वानखेड ग्रामस्थानी केली आहे.या संदर्भातउपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांचेकडे निवेदन दिले असून त्याची त्वीत अंमलबजावणी न झाल्यास १ जानेवारी पासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा ग्रामस्थानी दिला आहे.
सौरभ लेंभे यांना या गावातील ग्रामस्थांना वेळ देणे शक्य होत नाही. परिणामी वानखेड येथील तलाठी कार्यालयात गेले वर्षभर तलाठी उपलब्ध नाही. कामकाजासाठी ग्रामस्थांना चकरा माराव्या लागतात. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त असून यासंदर्भात शासनाने तात्काळ वानखेड येथे कायमस्वरूपी तलाठी नियुक्त करावा अशी मागणी सरपंच मंगला ताई रंगभाल यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यासंदर्भात ग्रामस्थांच्या भावना विचारात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी अन्यथा १ जानेवारी पासून तलाठी कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा उपसरपंच राजु पाखरे व ग्रामस्थांनी दिला आहे.

वानखेड सजअंतर्गत दुर्गादैत्य,रिंगऩवाडी , या दोन गावांचा समावेश असून या ठिकाणी तलाठी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. तलाठी उपलब्ध करून न दिल्यास कार्यालयास कुलूप लावण्याशियाय अन्य पर्याय नाही- 
सरपंच, वानखेड

वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे सातबार्या साठी तलाठी कार्यालयात दोन दिवसांपासून चकरा मारत आहे. मात्र, कार्यालयात तलाठी हजर नव्हते. या बाबीकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 
तलाठ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे आवश्यक आहे. बाहेरगावी गेल्यास, बैठक असल्यास तशा प्रकारची नोटीस लावावी. परिसरातील शेतकरी फेरफारसाठी, तर विद्यार्थी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आले होते. मात्र, कार्यालयील वेळेत तलाठी कार्यालयात हजर नव्हते. त्यामुळे शेतकरी विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. संजय गांधी निराधार कार्यालयाच्या आदेशवरून निराधार तसेच श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना अर्ज हा तलाठ्यांकडे जमा करावा लागतो. मात्र, कार्यालयात तलाठीच हजर राहत नसल्यामुळे अर्ज कोणाकडे द्यावा, असा प्रश्न ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित केला आहे. या बाबीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
स्वप्निल देशमुख, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा अध्यक्ष बुलढाणा 
मो 9552381088

    Post Views:  209


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व