मानवी अनैतिक वाहतूक कक्षाकडून बार्शिटाकळी गुन्ह्यात कारवाई
अकोला- अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने महिला वबाल अत्त्याचारग्रस्त भादंवी च्या कलम ३६३ व ३६६ अन्वये हरविणे किंवा बेपत्ता गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत ६९ गुन्हे व ३० हरविल्याची या केसेससह एकून ८९ प्रकरणे उघडकीस आणलेली आहेत.
अक़ला जिल्ह्यात बार्शिटाकळी येथील भादंवी ३६३ नुसार कलम ५४४/२३ चा गुन्हा नोंदविलेला होता.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.संदिप घुगे यांचे आदेशानुसार करण्यात आलेल्या तपासात या प्रकरणातील पिडीत बालिका व आरोपी यांचे मोबाईल लोकेशन लोहगड ,पुणे येथे आढळून आले. तेथून ते अकोला येथे येत असल्याची गुप्त माहिती बातमीदाराकडून मिळाल्यावरून सापळा रचण्यात आला.त्यांना दि ०५ जून २०२३ रोजी अकोला रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांना विश्वासात घेऊन बार्शिटाकळी पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कार्यवाही श्री.जिल्हा पोलिस अधिक्षक संदिप घुगे व अप्पर पोलिस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील वायदंडे,पोलिस उपनिरीक्षक विजय खर्चे,पोलिस हे.कॉ.सुरज मंगरूळकर, आशिष अघडते,धनराज चव्हाण, महिला पो.कॉ.पूनम बचे,यांनी केली असून उर्वरित गुन्ह्यांचे ही तपास चालू आहेत.
Post Views: 147