महिलादिनाच्या निमित्ताने... घडलय भरपूर काही


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  08 Mar 2022, 1:01 PM
   

घडलय भरपूर काही बरच काही घडणार आहे.. 
जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
लग्न वेदीवर चढताच हुंडाबळी जाणार आहे कुशीत सामावताच नष्ट केले जाणार आहे 
जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
पदराला हात चारचौघात घातला जाणार आहे पापी मात्र राजरोस मान उंचावून 
फिरणार आहेत जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
धुणीभांडी उष्टी खरकटी संसाराचा गाडा ओढणार आहे स्वयंपाक अळणी झाला 
म्हणून जीव घेतला जाणार आहे जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
शिकली-सवरली सुसंस्कारित लाडकी सासरी जाणार आहे हुंड्यात होंडा नव्हती 
म्हणून रॉकेल ओतले जाणार आहे जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
द्रौपदीचे हिस्से सीतेची अग्निपरीक्षा इतिहास साक्ष आहे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावला 
तरी उपेक्षितच राहिली आहे जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होणार आहे॥
मेळावे नि संमेलनांची केवळ केंद्रबिंदू राहणार आहे भोगवस्त होती भोग वस्तूच मानली जाणार आहे केवळ एक दिवस तिचा म्हणून साजरा होणार आहे घडलय भरपूर काही बरच काही घडणार आहे जागतिक महिला दिन दरवर्षी साजरा होत राहणार आहे॥
प्रा. सौ. वृंदा डहाके अकोला

    Post Views:  235


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व