अकोला: स्थानिक दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला तर्फे प्रा.विशाल कोरडे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांसाठी विविध शैक्षणिक ,सामाजिक व रोजगाराभिमुख कार्यक्रम संपूर्ण भारतभर राबवले जात आहेत . दिव्यांगांना रोजगार मिळावा या हेतूने दि.२५ सप्टेंबर २०२२ रोजी अपेक्षा अपार्टमेंट २ ,गणेश नगर ,लहान उमरी येथील दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला च्या कार्यालयात आयुर्वेदिक सुगंधी उटणे निर्मिती कार्यशाळा संपन्न झाली . कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून प्रा.विशाल कोरडे, प्रा.अरविंद देव,अनामिका देशपांडे,मेघा देशपांडे, वैशाली सोनकर , माधुरी कोरडे,जया देव व सुजाता नंद यांनी कार्य केले.दिव्यांग बांधवांना स्पर्श व गंधाच्या साह्याने आयुर्वेदिक घटक ओळखणे ,सुगंधी उटणे तयार करणे ,त्याचे पॅकिंग व मार्केटिंग याविषयी मार्गदर्शन केले . तुलसी कडुनिंब सुगंधी फुले व विविध आयुर्वेदिक घटकापासून तयार केलेले हे सुगंधी उटणे त्वचा व चेहऱ्याच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे . संस्थेतर्फे तयार केलेले हे सुगंधी उटणे दिवाळीच्या अभ्यंग स्नानाबरोबरच सर्वकाळ फेस पॅक म्हणून सुद्धा उपयोगात आणले जाऊ शकते,अशी माहिती रोहित सुर्यवंशी व मंजुषा खाडे यांनी दिली.स्थानिक ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत हे सुगंधी उटणे विकले जाणार आहे .उटण्याच्या विक्रीतून येणारा निधी दिव्यांग शिक्षणासाठी उपयोगात आणला जाणार आहे .ह्या उत्पादनाची मागणी करण्यासाठी व उटणे निर्मिती संदर्भात प्रशिक्षण घेण्यासाठी दिव्यांग बांधवांनी दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या ०९४२३६५००९० या हेल्पलाइन वर संपर्क साधावा.असे आव्हान आयोजन समितीतर्फे श्वेता धावडे, पुजा गुंटीवार,भारती शेंडे ,वंदना तेलंग ,स्वाती झुनझुनवाला ,तृप्ती भाटिया ,स्मिता अग्रवाल ,विजया वाघमारे व शुभांगी मानकर यांनी केले आहे .
Post Views: 165
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay