स्वामी जोमानंद शिष्य समुदायाकडून गुरुपोर्णिमा उत्सव संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
21 Jul 2022, 4:48 PM
अकोला : प.पू. महायोगीराज स्वामी जोमानंद यांच्या शिष्य समुदायाच्या वतीने गुरुपोर्णिमेच्या उत्सव नाशिक मधील शर्मा मंगल कार्यालय, मुंबई नाका येथे संपन्न झाला. यावेळी प.पू. महायोगीराज स्वामी जोमानंद यांचेसोबत परमहंस दिपक बाबा, अकोला तेजस्विनी माता, वाडेगांव, संकेत बाबा चोहट्टा बाजार, सोमेश्वरानंद नाशिक, ही परमहंस भक्तांना महाराज मंडळींनी उपस्थित राहून आशिर्वाद प्रदान केले. प.पू. महायोगीराज स्वामी जोमानंद महाराज यांनी आपल्या प्रवचनातून परमहंस सत्याचा परिचय देऊन मानवी जीवनातील समस्याग्रस्त वाटचाल आणि त्यावर मात करण्याचे उपाय याबाबत मानवी जीवनमुल्यांवर भर देणारे मोलाचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी हभप अरुणराव बोडस वाशिम यांच्या सुश्राव्य किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांचेसोबत अंकुश अंबरपुरे तबला वादक व गजानन ढवळे यांना हार्मे नियमवर साथ दिली. श्री विजय जोशी, सौ. मंजुषा जोशी व कु. श्रृती विजय जोशी आणि परिवार यांच्या गीतगायनाच्या सुमधुर कार्यक्रम यावेळी आयोजित केलेला होता. यावेळी जय शंकर भजनी मंडळ नाशिक यांनी भजनसेवा दिली. डॉ.पुरूषोत्तम पुरी व सहकार्यांनी रक्तदान शिबीराची
जबाबदारी पार पाडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय जोशी, दिनेश जोशी, संजय शिराळकर, ओमप्रकाश मिश्रा, मंगेश जोशी, धनंजय दाभाडे, अजय चौधरी, बापू मेतकर, मकरंदजी केसकर, सचिन गरुड, अमोल भालेराव, सौ. हर्षा फिरोदिया व नाशिक, पुणे, अकोला मुंबई व गुजरातमधील महायोगीराज स्वामी जोमानंद सेवा समितीच्या शिष्यांनी तथा आयोजन समितीचे सर्व पदाधिकारी व शिष्य समुदायाने सेवा दिली. या कार्यक्रमासाठी वाहतुक व्यवस्था बाबाराव लाडकर, दिनेश मिश्रा, जगदिशानंद बातुल दिपक देशमुख यांनी सांभाळली. महाप्रसाद नियोजनची जबाबदारी सौ. मंजुषा जोशी, सौ. शिला कुलकर्णी, सौ. अंजली तांबोळी, सौ. ज्योती जोशी यांनी तर रांगोळी सजावट कु. वर्षा मिश्रा पार पाडली.
Post Views: 369