अकोला ः मा. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर तसेच मा. पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम 363, 366 (अ) भादवि, तसेच महिला मिसिंग यामध्ये अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने मागिल महिन्यापासून आज पावेतो एकूण 30 गुन्हे व 17 मिसिंग असे एकूण 47 प्रकरणे उघडकिस आणली आहेत.
पोलिस स्टेशन अकोट शहर येथे अप क्रमांक 896/2021 दाखल असून तो प्रलंबित होता. सदर महिलेबाबत शोध घेत असताना गुप्त बातमीदारांमार्फत नाशिक येथे असल्याबाबत माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी पिडीत मुलीचा व आरोपीचा नाशिक येथे शोध घेऊन पिडीत मुलीला विश्वासात घेवून विचारपुस केली. पुढील कार्यवाहीसाठी अकोट शहर पो.स्टे. ला रितसर ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक संजय खंदाडे, सपोनी महेश गावंडे, पा. उपनिरीक्षक सुकेश जमघाडे, पो.उप निरीक्षक विजय खर्चे, पो.हे.कॉ. सुरज मंगरुळकर, धनराज चव्हाण, आशिष अघडते, पुनम बचे, करिष्मा गावंडे यांनी केली असून लवकरच इतर गुन्ह्यांमध्ये सुद्धा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसून शोध घेऊन गुन्ह्यांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करीत आहे.
Post Views: 181