यात्रेदिवशीच चांडगावावर शोककळा मायलेकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  24 Apr 2025, 10:43 AM
   

वैभव हराळ (जिल्हा प्रतिनिधी)
श्रीगोंदा - श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यांची दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी यात्रा होती त्यामुळे घरातील स्वच्छता करण्यासाठी श्री राजेंद्र हिरामण लोंढे यांनी घरातील आवराआवर करुन घर धुत असताना विजेचा धक्का बसला मुलाला वाचवण्यासाठी आई सखुबाई हिरामण लोंढे या धावुन आल्या मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. दोघाही मायलेकांना ताबडतोब श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला हि घटना सकाळी आठच्या सुमारास घडली. आज गावाची यात्रा असल्याने आणि घडलेल्या या दुर्दैवी घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. यात्रेच्या दिवशीच अशी दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यांत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी,भावजय,चार बहिणी व दोन मुले असा परिवार आहे

    Post Views:  226


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व