अकोला - पाटील समाज | अकोला चे वतीने तयार करण्यात आलेल्या योगायोग नामक उपवर वधू परिचय पुस्तीकेचे प्रकाशन रविवार दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी दुपारी ३ वाजता महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांचे हस्ते आयोजीत करण्यात आले आहे. जुन्या आर.टी.ओ. कार्यालया समोरील मराठा सेवा संघाच्या सभागृहात सदर कार्यक्रम होईल. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून शेगांव येथील माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरराव पाटील उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर हे भुषवितील. या प्रसंगी अतिथी म्हणून अकोला जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष संग्रामभैया गावंडे, मराठा महासंघाचे विभागीय अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव पटोकार, दत्तात्रय नागरी सहकारी पत संस्थेचे अध्यक्ष जगदीश मुरूमकार उपस्थित राहतील. याच कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणाऱ्या जेष्ठ व्यक्ती तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करीत असलेल्या व्यक्तींचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात येईल. ज्या पालकांनी मुला-मुलींची नोंदणी केली असेल त्यांना पावती दाखवून कार्यक्रम स्थळीच योगायोग पुस्तीका देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. असे पुस्तीकेचे संपादक प्रदीप खाडे यांनी कळविले आहे. तरी सदर कार्यक्रमास पालकांनी बहुसंस्थेने उपस्थित रहावे असे आवाहन पाटील समाज अकोलाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी केले आहे.
Post Views: 192
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay