निंबा (लूकमान शहा) : बाळापूर तालुक्यातील ग्राम उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकार यांच्या मार्गदर्शनाखाली निंबाफाटा येथे पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत रुट मार्च काढण्यात आला. उरळ पोलीस स्टेशन हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी रुट मार्च काढण्यात आला आहे. अगामी हनुमान जयंती, रमजान ईद ,श्रीराम नवमी,महात्मा फुले जयंती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सन उत्सव शांततेत पार संपन्न होण्यासाठी आज उरळ पोलीस स्टेशन च्या वतीने रुट मार्च काढण्यात आला. पथसंचालन करतांना उपस्थितीत .उरळ येथील ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब, पि. एस. आय. गोमासे, किशोर पाटील, राजाभाऊ बचे, ढोकणे मेजर, बेस ठाकूर ट्राफिक पोलीस, दिनकर इंगळे, शैलेश घुगे, मुडे, विजयसींग झाकरडे, गजानन ठोंबरे, व उरळ येथील सर्व पोलीस कर्मचारी तसेच सर्व होमगार्ड रुट मार्च काढण्यात उपस्थितीत होते.
Post Views: 417