तू लढायला शिक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Jul 2022, 9:55 AM
   

नाहीस तू लाचार नारी
सहनशिलतेची तू मूर्ती
तुझ्याच उदरात विश्वाची निर्मिती
जोडते घरादाराला हीच कीर्ती. 


कधी दुःखाच्या कोंदणात
हार तू मानू  नकोस 
भेटतील नराधम पदोपदी
खचून तू जाऊ नकोस--
.
बलात्कारी हा समाज सारा
नसे भावनेला येथे थारा
उठा एल्गार पुकार उचल
शस्त्र नराधमांची खांडोळी  करा---

नाही येथे मानवतावादी
सारे बनले  नक्षलवादी जातीचे
जागृत कर अंतरातल्या स्त्रीला
स्वाभिमानी बाणा लक्षण जिंकण्याचे---

पेटव मशाल तुझ्या कर्तव्याची
पुढ्यत ठेव प्रतिमा सावित्रीची
माऊली ,उद्धारक स्त्री शिक्षणाची
जगाला गरज खऱ्या भिमाईची---

वसा दिला भीमाने लेखणीचा
पाहू नकोस उघड्या डोळ्यांनी
अन्याय होताना ,यशाचे तोरण
बांध समता,बंधुता ,ऐक्यानी--

अनिता देशमुख नांदुराबुलढाणा)
ह.मू. कल्याण

    Post Views:  166


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व