परळी पोलखोल आयेजीत यज्ञ गायत्री यज्ञ का व कशासाठी ?
समस्त बंधू आणि भगिनींनो!
आज आपण पाहत आहोत देशात समस्या समस्या आहेत. आपण भारत महासत्ता
होण्याचे स्वप्न पाहत आहोत. परंतु समस्यांचे समाधान व्हावे असे कोणाला का वाटत नाही?
सर्व जण माझं माझं विचार करत माझं, घर माझा परिवार,माझे नातेवाईक, माझी जात, माझा धर्म, माझा समाज, ह्या पलिकडे माझा देश असं का विचार करत नाहीत .
देशातील महापुरुषांनी अहोरात्र मेहनत करुन स्वःचे प्राणांचे बलिदान देऊन तुम्हा आम्हाला स्वतंत्रता दिली व लोकशाही गणराज्य देश बनवून दिला .आपण त्या देशाची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न करत आहोत? प्रांतवाद भाषावाद हा कधी जाईल? ईतर अनेक समस्या ऊत्पन्न होत आहेत. समाधानाचं नावचं नाही.ही गोष्ट लोक शोधत नाहीत .
तरुण व्यसनी होत चालला आहे. वाढत्या व्यसनांनी महिलांवर अत्याचार, बलात्कारासारख्या घटना घडत आहेत. त्याचे समाधान शोधणे गरजेचे आहे.ते समाधान हे फक्त लोकांची मानसिकत्ता बदलण्यातूनच प्राप्त होऊ शकते.म्हणून मला असं वाटते की वैदिक पद्धतीने आपण ज्या संस्कुती मध्ये जगतो, ती वैदिक संस्कुती आहे. त्यामध्ये यज्ञाला म्हत्व आहे. म्हणून यज्ञ करण्याची संकल्पना मला आली. परंतु हा यज्ञ माझा एकट्याचा नसून लोकशाहीतील समस्त लोकांचा, धर्माचा आहे. कारण एक पत्रकार म्हणून अन्यायाच्या विरोधात जनजागुत्ती तर करतोच, परंतु एक देशवाशी म्हणून प्रार्थना करायची आहे. त्यासाठी लोकशाहीतील सर्वच लोकांची गरज आहे. जनता निवडून देते म्हणून ती लोकशाहीत श्रेष्ठ आहे.प्रतिनिधी प्रश्न सोडवतो म्हणून तो पण तेवढाच महत्वाचा आहे. अधिकारी कायदा व्यवस्था राखतो व सांभाळतो तो पण महत्वाचा आहे. पत्रकार ह्या सर्वांच्या सहकार्याने जनजागृती दुत म्हणून काम करतो.त्याचप्रमाणे यज्ञाच्या ध्वनीकंपण शक्तीतून लोकांच्या मानसिकतेमध्ये परिवर्तन घडवणे हे यज्ञाचे म्हत्वाचे काम आहे. असं मला वाटतं. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून विचार केला तर हे कर्तव्य वाटते. ते केले पाहिजे कारण देशाला ह्याची गरज आहे.परमेश्वराला एक अश्या शक्तीची मागणी करायची आहे, की हा देश अखंड आणि सामाजिक समस्याविरहीत राहीला पाहिजे.समस्यांचे समाधान मिळाले पाहिजे .
वाढते ग्लोबल वार्मिंग.प्रदुषण, महापूर अनेक संकटांनी लोक त्रस्त आहेत. याबाबत परमेश्वरी गायत्रीच ह्याचं समाधान करु शकते. ही एक प्रकारची सेवा आहे. ह्याचं एक पत्रकार म्हणून आयोजन ह्यामुळे केलं आहे की, देशाच्या ईतिहासात पत्रकाराची भुमिका खुप महत्वाची आहे. अनेक जनसामान्यानीं ह्यात यावं आणि देशासाठी एक आहुती टाकावी. ज्याने आपले व आपल्या महान संतांनी समाजसुधारकांनी पाहिलेल्या भारताचे स्वप्न पुर्ण करण्याची शक्ती प्राप्त होईल.
- भगिरथ बद्दर, संपादक
परळी पोलखोल
मोबा.क्र. ९४२२१७७४८२
Post Views: 23