संजीवन समाधी म्हणजे चित्त व प्राण पंचमहाभूतात विलीन करुण चिरकाल चैतन्य निर्माण करणे : प्रवचनकार डॉ. रविंद्र भोळे
शिंदेवाडी (पुणे) : समाधी हि पतंजली योगाचि सन्कल्पना असुन अष्टांग योगातिल यम, नियम, आसन, प्रत्यहार, प्राणायाम, धारणा, ध्यान व त्यातील समाधी ही शेवटची योगाची पायरी आहे. तंत्रसमाधी, तटस्थ समाधी, पवित्र समाधी, चिरंजीव समाधी, जलसमाधी, संजीवन समाधी असे शास्रात समाधीचे वर्णन असुन चित्तवृती निरोध रोखून चित्त व प्राण पंचमहाभूतात विलीन करणे व सदैव्य,चिरकाल चैतन्य निर्माण करणे म्हणजे संजीवन समाधी होय.सद्गुरु दौलत बाबा ह्यानी संजीवन समाधी घेऊन परिसर पवित्र केला असे मत जेष्ठ प्रवचन्कार, समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे ह्यांनी येथे व्यक्त केले. श्री नाथ सांप्रदाय सद्गुरु दौलत बाबा मठ ट्रस्ट शिंदेवाडी येथे दौलत बाबा ह्यांचा चौसस्ठ व्या संजीवन समाधी कार्यक्रमात प्रवचन करताना समाधी सोहळ्या निमित्त वरिल मत प्रतिपादन केले. तसेच संत दौलत बाबा परिसर तिर्थ क्षेत्र व्हावे व परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, रोगी लोकानी योगी व्हावे व तरुणांनी व्यसनमुक्त रहावे, ह्या महान योगी सद्गुरु यादव बाबा ह्यांचा आदर्श घ्यावा, असेही हभप डॉ. रविंद्र महाराज भोळे ह्यांनी आपल्या प्रबोधन्पर प्रवचनात व्यक्त केले. ह्यावेळी दौलत बाबा मठ ट्रस्टचे सर्व कार्यकर्ते, परिसरातील भाविक भक्त, गावकरी, भजनी मंडळ, विद्यार्थी, वारकरी बहूसंखेने उपस्थीत होते. दरवर्षी संजीवन सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध, नामवंत समाजसेवक डॉ. रविंद्र भोळे उरुळीकांचन ह्यांच्या प्रवचनाचे आयोजन अनेक वर्षापासून करण्यात येत आहे.
Post Views: 191