पाटील समाजाच्या ५ जानेवारी च्या वधू वर परिचय मेळाव्याची तयारी पूर्ण


 संजय देशमुख  25 Dec 2024, 6:51 AM
   


         
अकोला...... स्थानिक जानोरकर मंगल कार्यालयात पाटील समाज अकोला तर्फे 5 जानेवारी 2025 रोजी आयोजित भव्य अशा वधू वर परिचय मेळाव्याची तयारी पूर्णत्वास आली आहे. या मेळाव्याचे आयोजन समितीची सभा आज पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यात विविध समित्यांचे गठन करण्यात येऊन प्रत्येकावर मेळाव्याची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रारंभी समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी प्रास्ताविक करून मेळावा आयोजनाची रूपरेषा उपस्थित असलेल्यांना समजावून सांगितली. या मेळाव्यात डिजिटल स्वरूपातही उपवर मुला मुलींचा परिचय करून देण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याची जबाबदारी अविनाश पाटील सांभाळीत आहेत.
              आयोजन समितीच्या वतीने मुला मुलींच्या परिचय पत्राची योगायोग नामक एक वेबसाईट बनविण्यात आली असून त्याची जबाबदारी समितीचे कार्याध्यक्ष सुनील जानोरकर व सहसचिव विजय बोरकर सांभाळीत आहेत. या वेबसाईटवर शेकडो उपवर मुला मुलींचा परिचय उपलब्ध होणार आहे. भारतातील तसेच जगात कुठेही वास्तव्यास असलेली उपवर मुले मुली या वेबसाईटवर आपल्या नावाची नोंदणी करू शकतात.
           मेळाव्यास व्यापक प्रतिसाद मिळावा याकरिता आज पासून काही पदाधिकाऱ्यांचे तालुका निहाय दौरे आयोजित करण्यात आले आहेत. याशिवाय पॅम्प्लेट, फ्लेक्स आधी द्वारे ही मेळाव्याचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. दिनांक पाच जानेवारी 25 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत चालणाऱ्या या परिचय मेळाव्यात समाजातील बंधू-भगिनींनी बहुसंख्येने सहभागी व्हावे तसेच आपल्या उपवर मुला मुलींना सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी करावे अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे 
           आजच्या नियोजन कार्यक्रमाच्या सभेत पाटील समाजाचे अध्यक्ष अशोकराव अमानकर, सचिव प्रदीप खाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, सहसचिव विजय बोरकर यांचे सह देवराव हागे पाटील, निलेश पवित्रकार, डॉक्टर दिलीप मानकर, गजानन हरणे, सुरेश गाडे पाटील, संजय मालोकार, विनायकराव गावंडे, अविनाश पाटील, विनायकराव शेळके, वासुदेवराव कडू , विक्रम जानोरकर, सागर अमानकर, अतुल अमानकर, अविनाश नाकट, शरद पांडे संदीप महल्ले, शैलेंद्र काळे, दिनकरराव सरप, विठ्ठलराव माळी, प्राध्यापक दत्तात्रय भाकरे, श्याम कुलट, प्रकाश चतरकर, योगेश थोरात, वसंतराव घनोकार आदी उपस्थित होते.

    Post Views:  137


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व