सिव्हील लाईन ते सुधीर कॉलनी दरम्यान अतिक्रमणचा सफाया


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  05 Apr 2022, 9:03 PM
   

अकोला- सिव्हील लाईन चौक ते सुधीर कॉलनी, जवाहर नगर परिसर व बारा ज्योतिर्लींग मंदीरासमोरील अतिक्रमणचा सफाया करण्यात आला. बांधकाम साहित्य रस्त्यालगत ठेवलेल्या व्यावसायीकाला दंड आकारण्यात आला. यामुळे या मार्गाने मोकळा श्वास घेतला असुन वाहतुकीला दिलासा मिळाला आहे.
शहरात मुख्य रस्त्यालगत व गल्लीबोळात अतिक्रमण थाटण्यात आले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. आज, मंगळवारी अतिक्रमण निर्मुलन पथकाने शहराच्या मध्यभागी असलेल्या सिव्हील लाईन चौक ते सुधीर कॉलनी दरम्यान अतिक्रमितांवर कारवाई केली. या रस्त्यालगत थाटलेले अतिक्रमण हटविण्यात आले. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना हुसकावून लावत रसवंतीवरही कारवाई करण्यात आली. रस्तालगत असलेली भाजीपाला विक्रीची कच्ची दुकाने भुईसपाट करण्यात आली. जवाहर नगर पोलिस चौकी लगत असलेले अतिक्रमणचा सफाया करण्यात आला. रस्त्यालगत मांडलेले रेती व विटा यासाठी बांधकाम व्यावसायीकांना तिन हजार रुपये दंड आकारण्यात आला. तसेच बारा ज्योतिर्लिंग मंदिरा समोरील अतिक्रमण व अवैध फ्लॅक्सवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे वाहतुक सुरळीत झाली असुन वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक असते त्यातच हा मार्ग अरुंद आहे अशा परीस्थितही या मार्गावर अतिक्रमण थाटण्यात आले होते. आयुक्त कविता द्विवेदी व सहा. आयुक्त अतिक्रमण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण निमुर्लन पथकातील कर्मचारी सहभागी होते.

    Post Views:  332


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व