रूचकर भोजन आणि खाद्यपदार्थांची खवय्यांसाठी जठारपेठ चौकातील खमंग मेजवानी जैन रेस्ट्रो..!
अकोल्याच्या हॉटेलिंग आणि व्यवसायाच्या व्यापक गर्दीत नुसता व्यावसायिक दृष्टीकोण न ठेवता ग्राहकांच्या अभिरूचीचा कल ओळखून त्या अनुरूप आस्वादाने अनेकांच्या पसंतीला उतरलेले काही मोजकेच व्यावसायिक आहेत. त्यात अकोल्यातील जठारपेठेत जैन परिवाराचे सध्या नव्यानेच सुरू झालेले जैन रेस्ट्रो हे खवय्यांच्या अभिरूची पसंतीच्या परिक्षेत पास झालेले एकमेव ठीकाण ठरत आहे....!
व्यवसाय आणि संस्कारक्षम जीवनातून सामाजिक बांधिलकीची जाणीव जेथे जपली जाते, असे कर्तव्यभावनेने व्यवसायात स्थिर झालेले मोजकेच व्यावसायिक यशस्वी प्रवासाच्या दिशेने प्रगतीची अविरत वाटचाल करीत असतात. जिथे स्वत:च्या अर्थाजनासोबतच आपणास समाजालाही काहीतरी देणं लागते या भावनेने सेवा म्हणून व्यवसायात समतोल विचारांनी स्थिर असतात.त्याच मार्गाने वाटचाल करणारं जैन कुटूंब आहे..!
अकोल्यातील जैन बांधव श्री रमेशसेठ जैन व मदनजी जैन यांनी ३५ वर्षापूर्वी हॉटेलिंग आणि कॅटरींगच्या व्यसायाचा शुभारंभ केला.तसं त्यांचं स्टेशन चौकातील जैन भोजनालय व जैन लॉजिंग हे विविध खाद्यपदार्थांच्या रूजकर स्वादाने आणि त्याच्या जोडीला ग्राहकांसोबत अत्यंत विनयशील सौजन्न्यशील वागणूक आणि अचूक सेवाव्यवस्थापनाने नावारूपाला आलेले आहे. जैन रेस्ट्रो हा त्यांचा आत्ता एक-दिड वर्षापूर्वी सुरू केलेला नवा उपक्रम आहे!
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून व्यवसायातूनच गरजूंची सेवा, यातून जैन धर्माच्या सेवा परमो धर्म या संदेशाचे अनुकरण जैन बंधूकडून होत आहे. म्हणून व्यवसायिक विचारांच्या पलिकडे जाऊन त्यांच्या या हॉटेलातून दवाखाण्यातील रूग्णांना अत्यंत सवलतीच्या दरात कींवा ज्यांची बिलकूल ऐपतच नाही अशी खात्री पटल्यावर अशांना अपवादात्मक परिस्थितीत विनामुल्य भोजनसेवाही दिली जाते.
त्यांनी स्थापन केलेल्या या व्यवसायात त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकून त्यांचे चिरंजीव ईश्वर जैन आणि त्यांचे छोटे बंधू ऐडव्होकेट असलेले दिपक जैन हे ग्राहकांच्या सेवेत याच सेवाभावनेतून कार्यरत आहेत. ईश्वर जैन यांचे सामाजिकतेचे आणखी एक अंग आहे. त्यांनी स्टेशन व स्टेशन चौकात व्हाईटनर सूंघून नशा करणाऱ्या लहान टपोरी मुलांचे समुपदेशन करून त्यांना यातून बाहेर काढण्याचेही त्यांचे एक सेवाकार्य आहे...!
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे ..! असे शास्त्र ज्याप्रमाणे सांगते, त्याचप्रमाणे त्या रसोईघरातून अन्न पूरविणारी व्यक्ती कोणत्या संस्कारांची, कोणत्या विचारांची आहे या महत्वाच्या विषयाशीच त्या भोजनाची रूची निघडीत असते, आणि हे प्रयोगशिलतेतून अनेक ठीकाणी सिध्दही होत असते.मग अशा ठीकाणी उदरभरण नोहे जाणीजे पुण्यकर्म म्हणत जेवणाची तृप्ती अनुभवणारे त्या भोजनाचे वर्णन करत असतात.त्यावेळी आपसूकच तिथल्या जेवणाची चव काही वेगळीच होती असं बोलतांना बरेचजण आढळतात.त्याचप्रमाणे स्टेशन चौकातील जैन भोजनालय आणि जठारपेठेतील जैन रेस्ट्रोमधील जेवणाचा....कॅटरींग सर्व्हीसचा अनुभव ज्यांना आलेला आहे तेच याबद्दल योग्य तेच सर्वत्र सांगत असतात.कारण ते भोजन तृप्तीच्या आनंदातून व्यक्त झालेले अभिप्राय असतात.
जैन रेस्टोमध्ये जैन स्पेशल थालीसह,सर्व प्रकारच्या पनीरच्या भाज्या,चिज बटर मसाला व विविध व्यंजनाची चव वेगळीच जाणवते.सौजन्न्यशील वागणूक,बसण्यासाठी मोकळी,शांत व प्रशस्त जागा हे जठारपेठ चौकातील एक आकर्षण ठरत आहे.
आमच्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या सम्यक संबोधीमधील प्रथम स्नेहमिलन मेळाव्यात आमच्या पत्रकारांची भोजनसेवा ईश्वर आणि दिपक जैन यांनी माफक मोबदल्यात पार पाडली होती.त्या भोजनाची आमच्या प्रत्येक सभासदाने तोंडभरून तारीफच केली. त्यापूर्वीही एक कार्यक्रम त्यांनी केला होता.त्यानंतर आमचा प्रत्येक महिण्याला होणाऱ्या व यावेळीच्या दि.२२ जानेवारीच्या विचारमंथन मेळाव्यात त्यांनी आमच्या पत्रकार सभासदांना वाजवी दरामध्ये नाश्ता म्हणून खमंग मिसळपावाच्या दिलेल्या उपहाराचीही सर्वांनी स्तूती केली.अनेकांनी कुटूंबासह येण्याच्या भावनाही व्यक्त केल्या.भोजनासोबतच जैन पाव भाजी,मिसळ पाव,वडा सांभार ईडली हे पदार्थही त्यांचे तारिफ करण्यासारख्या अभिनव चवीचे असतात.विनम्र सेवेसोबतच ग्राहकांसोबत स्नेहपूर्ण संबंधाने सेवा देणारा येथील आदर आतिथ्यशील कर्मचारी वर्ग ही सुध्दा एक विशेषत: आहे. अभिरूचीच्या तुलनेत ईतर हॉटेल आणि कॅटरींग व्यवसायाच्या तुलनेत किमान २० टक्क्यांनी कमी असलेले त्यांचे माफक दर हेच त्यांच्या सेवाभावी वृत्तीचे निदर्शक आहे.पत्रकार मेळाव्याचे कार्यक्रम जैन रेस्टोला देऊन भोजन आणि खाद्यपदार्थ,व्यंजनांतून त्यांच्या रूचीसंपन्नतेच्या घेतलेल्या अनुभवानंतर जैन रेस्टोबद्दल लिहण्याचा विचार आला....आणि वेगवेगळ्या खवैय्यांसाठी अकोला शहराच्या मुख्य केंन्द्रस्थानी असलेले हे दालन ईतरांनाही परिचित करून देण्याचा मोह आवरला नाही...जसा खाण्याचाही आपण आवरू शकत नाही... सेवा आणि प्रयोगशीलतेतून व्यावसायिक मुल्य सांभाळीत प्रगतीच्या दिशेने जाणाऱ्या जैन कुटूंबियांना मनोमन शुभेच्छा ...एक ग्राहक म्हणून आणि तृप्तीचे ढेकर दिलेल्या आमच्या पत्रकार बांधवांकडूनही...!
संजय एम.देशमुख ,
संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष-लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ (रजि.अ.भा.)
Post Views: 412