राणेंचे नाव घेऊन धमकी, देशमुख म्हणतात, उद्या भेट!


आ. देशमुख यांना अज्ञात इसमाने मोबाइलद्वारे दिली जिवे मारण्याची धमकी
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  07 Feb 2023, 9:34 AM
   

अकोला ः अकोल्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना (ठाकरे) आ. नितीन देशमखु हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रविववारी सकाळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने दोन वेळा फोन करून नारायण राणेंच्या नावाने जिवे मारण्याची धमकी दिली. धमकी देणार्‍या व्यक्तीला थेट आव्हान देत मंगळवार 7 फेब्रुवारी रोजी मुंबईत भेटू काय करतो करून दाखव, असे प्रतिआव्हान दिल्याची माहिती आ. देशमुख यांनी दिली. 
अज्ञातच्या कॉल प्रकरणातील सारा घटनाक्रम आ. देशमुख यांनी उलगडला. ते म्हणाले, रविवारी सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास अनोळखी नंबरवरुन दोन-तीन कॉल आल्यावर कार्यक्रमातील व्यस्ततेमुळे उचलले नाहीत. मात्र, पुन्हा कॉल आल्यावर उचलला. पलीकडून बोलणार्‍या व्यक्तीने थेट नारायण राणेंच्या विरोधात का बोलतो? राणेंनी अनेकांना संपवून समुद्रात टाकले, तुझीही तशीच गत करू? अशा ऐकेरी भाषेत धमकी दिल्याचे त्यांनी सांगितले. धमकीची भाषा ऐकूण त्या कॉलरला त्याच्याच भाषेत उत्तर देत, मी कुणाला घाबरत नाही, उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ज्या भाषेत बोलाल त्याच भाषेत उत्तर देऊ. हिंमत असेल तर राणे पिता-पुत्रांना घेऊन मंगळवारी मुंबईत ये. मी सकाळी 10 वाजता नरीमन पॉइंटला वाट पाहत आहे, असे प्रत्युत्तर दिल्याचे ते म्हणाले. 

    Post Views:  268


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व