खामगाव (शेखर तायडे) : भारत सरकारचा दिव्यांग सशक्तीकरण आणि सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार व भारतीय कृत्रीम अंग निर्माण संस्था एलिम्को यांच्या वतीने दिव्यांग घटकाला तसेच ज्येष्ठ वयोवृद्ध नागरिकांना सामाजिक प्रवाहात आणण्याकरता विविध उपयुक्त साधनांच शिबिर जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
दिनांक 28 मे ला निवासी मुक बधिर विदयालय खामगाव येथे सकाळी १० ते ५ या वेळेत दिव्यांग व जेष्ठ नागरिक यांना मोफत साहित्य वाटपासाठी तपासणी करण्यात आली या शिबिरामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह दिव्यांगांना त्यांच्या टक्केवारीनुसार विविध साहित्यांची नोंदणी करण्यात आली.या शिबीरात तपासणी नंतर गरजु व आवश्यक रूग्णांना साधारण दोन महिन्यानंतर साहित्य वाटप केले जाणार आहे. एडीआयपी या योजने अतर्गत तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, बॅटरीवर चालणारी मोटारइज्ड, तीन चाकी सायकल, कुबडया, वॉकींग स्टिक, सिपी चेअर, बीटीई श्रवणयंत्र ब्रेलकेन, ब्रेलस्लेट, ब्रेलकिट, सुगम्यकेन, स्मार्टफोन, कृत्रिम अवयव कॅलीपर, इत्यादी साहित्य मिळणार आहे. तसेच आरव्हीआय योजने अतर्गत जेष्ठ नागरिकांना व्हीलचेअर कमोडसह व्हीलचेअर, कमोड खुर्ची, कुबडया, चालण्यासाठी काठी, ट्रायपॉड, ट्रायपॉड, चष्मा श्रवणयंत्र, ग्रीवा कॉलर, गुडघा ब्रेसडेंचर, एलबेल्ट इत्यादी साहित्य मिळणार आहे. हे शिबीर दिव्यांग व जेष्ठ नागरीकासांठी महत्वाचे असुन या शिबीराचा लाभ घेतला. या शिबिराला निवासी मूकबधिर विद्यालय खामगाव चे अध्यक्ष डॉ. गोपाल सोनी सचिव ब्रिजगोपाल भट्टड यासह मुख्याध्यापक डॉ प्रकाश जगताप विराट मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्ष व पत्रकार मनोज नगरनाईक यासह भारत सरकार प्राधिकृत अलीम को या संस्थेचे डॉ.अक्षय मोरे , मयूर वर्मा , मितेश शहा , अभिषेक द्विवेदी यांनी दिव्यांगाची व जेष्ठ नागरिकांची तपासणी करून त्यांना आवश्यक असणारे साहित्य मिळण्याकरिता नोंद केली या करीता निवासी मूकबधिर विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
Post Views: 43