अकोला जिल्हयामध्ये मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक कक्ष महीला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६(अ) भादवि तसेच महीला मिसिंग चा तपास करत आहे. अनैतिक मानवी वाहतुक कक्षाने आज पावेतो एकुण ६८ गुन्हे व ३२ मिसिंग असे एकुण १०० प्रकरणे उघडकिस आणले आहेत. पोलीस स्टेशन खदान जिल्हा अकोला येथील अप क्र २७०/२२ कलम ३६३ भादंवी चा गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा १८ महीण्यापासुन प्रलंबित होता. अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला येथे तपासकामी प्राप्त झाला असता अ.मा.वा. कक्ष येथील स्टॉप गुन्हयाचा तपास करित असतांना सदर गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांचा मिळालेल्या माहीती पुणे, खंडवा MP, अमरावती येथे शोध घेतला असता मिळुन आले नाही. तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार आरोपी व पिडीत मुलगी हे आरोपीचे घरी आल्याबाबत माहीती मिळाल्याने अ.मा.वा. कक्ष पो स्टॉप रवाना होवुन आरोपीचे घरी पिडीत मुलगी व आरोपी यांचा शोध घेतला दोघेही मिळुन आले. पिडीत मुलगी व आरोपी यांना गुन्हयाबाबत माहीती देवुन विश्वासात घेवुन विचारपुस करण्यात आली. गुन्हयातील पिडीत मुलगी व आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी पोलीस स्टेशन खदान चे ताब्यात दिले. सदर कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. संदीप घुगे सा. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे सा, उप विभागिय अधिकारी सुभाष दुधगावकर सा. शहर विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली उपरोक्त कामगिरी ही पोउपनि विजय खर्चे, पोहेकॉ सुरज मंगरूळकर, पोहेकॉ धनराज चव्हाण, पोकॉ पुनम वाहन चालक पोकॉ अविंद्र खोडे यांनी केली असुन लवकरच इतर गुन्हयामध्ये सुध्दा तत्परतेने पिडीत मुली व आरोपी यांचा कसून शोध घेऊन गुन्हयांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतुक कक्ष अकोला करित आहे.
Post Views: 170