सतेज पाटील कोल्हापूर जिल्हा बँकेतही बिनविरोध? विजयाची औपचारिकता बाकी


 संजय देशमुख  04 Dec 2021, 11:53 AM
   

कोल्हापूर: काँग्रेस नेते राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil) हे गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर स्थानिक स्वराज संस्था विधानपरिषद मतदारसंघातून बिनविरोध विजयी झाले होते. त्यांनतर आता थोड्याच दिवसात त्यांच्या आणखी एका बिनविरोध विजयाची औपचारिकता बाकी राहिली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (Kolhapur District Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सतेज पाटील बिनविरोध विजयी होणार आहेत. याबाबत अर्ज मागं घेण्याच्या दिवशी शिक्कामोर्तब होणार आहे.

सतेज पाटील विधानपरिषदेपाठोपाठ जिल्हा बँकेत बिनविरोध?

विधान परिषदेनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ही पालकमंत्री सतेज पाटील बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. जिल्हा बँक निवडणुकीच्या अर्ज माघारीच्या दिवशी यासंदर्भातील अधिक चित्र स्पष्ट होणार आहे.

समर्थकांचे अर्ज

सतेज पाटील यांचा गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून अर्ज
गगनबावडा तालुका विकास संस्था गटातून सतेज पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या गटातून आणखी दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सतेज पाटील यांच्या समर्थकांचेच ते दोन्ही डमी अर्ज आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांच्या विजयाची औपचारिकता बाकी राहिली आहे.

बिनविरोध निवडणुकीचा सतेज पाटील यांना विश्वास

विधानपरिषद निवडणुकीनंतर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली होती. सतेज पाटील यांनी जिल्हा बँकेसाठी गगनबावडा मधून अर्ज दाखल केला होता. त्यावेळी त्यांनी ज्या ज्या तालुक्यातील जागा बिनविरोध करता येतील त्या करत आहोत. कोणाच्या मागे किती मत हे इथं दिसतात त्यामुळं अभ्यास केला तर निवडणूक बिनविरोध करायला हरकत नाही, असंही सतेज पाटील म्हणाले होते.

विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

सतेज पाटील यांच्या विधानपरिषद सदस्यात्वाचा कार्यकाळ संपल्यानं कोल्हापूरसह राज्यतील 6 जागांसाठी विधानपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सतेज पाटील यांच्या विरोधात भाजपनं अमल महाडिक यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसनं धुळे नंदूरबार जागेवरील भाजपच्या अमरिश पटेल यांच्या विरोधातील अर्ज मागं घेतला. तर, भाजपनं सतेज पाटील यांच्या विरोधातील अमल महाडिक यांच्या विरोधातील अर्ज मागं घेतला. त्यामुळे दोन्हीजागा बिनविरोध झाल्या.

    Post Views:  216


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व