प्रेम, मानवता


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  16 Feb 2022, 12:22 PM
   

{चाल : भगवंताला भुललो म्हणुनी, तोही भुलला अपुल्याला}
मानवताहि गेली लयाला,
ना दया मया येथे उरली  ।
दोन शब्द प्रेमाचे बोलण्या ,
इथे  मानसे  का  हरली ॥धृ॥

जो तो धावतो पैशामागे ,
विसरोन  सारे  भवबंध ।
अनितीच्या लोभात बुडोणी ।
नसे मनात प्रेमाचा गंध ।
कर्तव्याला भुलला म्हणोनि,
आज  मानवता  इरली ॥१॥

बंगले माड्या,गाड्या घोड्या ,
तू खूप जोडले अनितीने ।
गरीबांना अन्नाचा घास तू ,
भरविलास  का  हाताने ।
किती जोडशील धन संपत्ती ,
हाव जीवाची ना सरली ॥२॥

दारू, गांजा, बाई, बाटली ,
व्यसनांचा हा पूर असे ।
भजन पूजन अन् कीर्तनात,
तुला कधिही वेळ नसे ।
आतातरि तू ये शुध्दिवर ,
वाट चूकीची का धरली ॥३॥

सेवाभाव सत्कर्म वडिलांचे ,
सार्थक कर या जन्माचे ।
सद्विवेकाला जागृत करोनी ,
थोडे कर्म कर परोपकाराचे ।
सत्संगाच्या  सहवासाने ,
कैकांना स्फुर्ती भरली ॥४॥

विश्वासाच्या श्रीगुरूदेवाचे ,
सुविचार मिळतील भक्तिचे ।
ध्यान प्रार्थना योग साधना ,
शिक्षण मानव कल्यानाचे ।
प्रेम,मानवता कशी राखावी ,
ग्रामगीतेतून आम्ही  शिकली ॥५॥

विश्वासराव देशमुख
शेगाव (निंबा) मोबा.क्र‌.९७६४९२५९८५

    Post Views:  356


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व