प्रा. मोहन काळे यांच्या पळस फुलला या कथासंग्रहाला कुंडल कॄष्णाई राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 May 2025, 12:20 PM
अकोला - येथील सुप्रसिध्द साहित्यिक प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे यांच्या पळस फुलला या कथासंग्रहाला साहित्यक्षेत्रातील मानाचा कुंडल कॄष्णाई प्रतिष्ठान सातारा यांच्यातर्फे देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर झाल्याचे कुंडल कॄष्णाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदरणीय हणमंतराव जगदाळे यांनी एका यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. सदर पुरस्कार दिनांक ११ मे ला सांस्कृतिक भवन, कूपर काॅलनी, सदर बाजार, सातारा येथे व्या साहित्य संमेलनात उद्घाटन कार्यक्रमात दि.११ मे ला संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध कादंबरीकार आ. शरदजी तांदळे, सुप्रसिद्ध कादंबरीकार आ. डॉ. राजेंदजी माने, कार्यवाह मराठी साहित्य परिषद पुणे आ. शिरीषजी चिटणीस , कोषाध्यक्ष मसाप पुणे कोषाध्यक्ष आ. विनोदजी कुळकर्णी, सुप्रसिद्ध कीर्तनकार आ. डॉ. सुहासजी फडतरे, प्रा. निरंजनजी फरांदे, सुप्रसिद्ध गझलकार आ. वसंतजी शिंदे, कुंडल कॄष्णाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आ. हणमंतराव जगदाळे, सचिव आ.सावित्रीताई जगदाळे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.
प्रा. मोहन ज्ञानदेवराव काळे हे सुप्रसिद्ध कवी, कथाकार, गझलकार,समीक्षक व वैचारिक लेखक असून ते अंकुर साहित्य संघ, विदर्भ साहित्य संघ, सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य मंच, अक्षरक्रांती साहित्य संघ, युगंधर साहित्य संघ, साहित्य,कला व व्यक्तिमत्व विकास संघ, अखिल भारतीय मराठी साहित्य संघ, काव्यप्रेमी शिक्षक संघ इत्यादी अनेक साहित्य संघांमध्ये सक्रीय आहेत. तसेच लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाशी ते जुळलेले आहेत. अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा ते सक्रीय आहेत. अनेक कवी संमेलने, गझल मुशायरे, कथाकथन कार्यक्रमांमध्ये सहभागी असतात. तसेच अनेक साहित्य संमेलनांमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी काव्यवाचनसुद्धा केलेले आहे. नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या 'पळस फुलला' या कथासंग्रहाला अक्षरक्रांती साहित्य सन्मान पुरस्कार, मां जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार, शिवांजली साहित्यपीठाचा उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, जीवन गौरव साहित्य परिषद यांचा राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार, प्रज्ञा साहित्य मंच महाराष्ट्र चा प्रज्ञा राज्यस्तरीय साहित्यकृती पुरस्कार, मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार, अंकुर साहित्य संघाचा अंकुर उत्कृष्ट साहित्यकृती पुरस्कार इत्यादी प्रतिष्ठित संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. प्रा. काळे यांच्या साहित्यामध्ये सकारात्मकता, आशावाद व मूल्यांची जपणूक असते. तसेच ते अनेक सामाजिक प्रश्नांवर आपल्या साहित्यातून व्यक्त होतात. सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा विचार त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित होतो. प्रा. मोहन काळे यांना कुंडल कॄष्णाई राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचेवर साहित्यिक मित्रांद्वारे अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.
Post Views: 263