हायकोर्टात नियुक्ती बद्दल बार टायपिस्ट कु. कल्याणी गुहे सन्मानित


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  06 Jul 2023, 5:38 PM
   

अकोला : कु. कल्याणी देविदास गुहे हीने कठोर मेहनतीतूुन यश संपादन केल्याने तिने मुंबई हायकोर्टची परीक्षा उत्तीर्ण करून क्लर्ककरीता निवड तसेच मुंबई मंत्रालयातील हायर ग्रेड व लोअर ग्रेड क्वॉलीफाय झाली असल्याने तिचा अकोला बार टायपिस्ट संघटनेकडून तिचा शाल, पुस्तके व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ़कल्याणीने  एम. कॉम.पर्यंतचे शिक्षण पुर्ण करून् शॉर्टहॅण्ड इंग्रजी ६० ते १२० व मराठीची ६०ते १०० परीक्षा उत्तीर्ण तसेच टायपिंगची इंग्रजी ३०ते ५० तसेच मराठी ३०-४०, हिंदी ३०-४० ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सध्या ़कल्याणीने मुंबई हायकोर्ट क्लर्क पदाकरीता निवड तसेच मुंबई मंत्रालयातील हायर ग्रेड व लोअर ग्रेड क्वॉलीफाय होऊन सन्मान मिळविला आहे. तिचे वडील वेल्डींगचा व्यवसाय करीत असल्याने त्यांचे डोळ्याला  दु:खापत झाल्याने त्यांना दिसत नाही व त्यांचेकडून काम होत नाही.  तसेच कल्याणीची आई मेडीकलवर कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून डाबकी रोडवरून उमरी येथे सायकलने ये-जा करून खाजगी नोकरी करते व कुटूंबाचा गाडा चालविते.  ़कु. कल्याणीला एक लहान भाऊ असून तो ८ वी मध्ये शिकतो आहे. ़कुटूंबाची जबाबदारी सांभाळून तिने यश संपादन केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी सौ. संजना बोरकर, सौ. जयश्री विसपुते, क्रांतीताई तेलगोटे, सौ. प्रिया ढोरे,सौ. सोनाली बोरीकर, ़ज्येष्ठ व सन्माननीय टायपिस्ट मोहम्मद कमरूद्दीन, अजय वानखडे, संजीव चवरे,  राजेश परदेशा, मनिष बागडे, सागर काशिकर,  शेख बिस्मील्ला, प्रवीण कावळे, कपिल इंगळे, आकाश खडसे, संजय इंगळे, पुरुषोत्तम कराळे, मोहम्मद सोहेल, स्नेहल गवई, सिद्धार्थ तायडे,चैतन्य तायडे, हिम्मत तायडे, नितीन दुरतकर, आदित्य गावंडे, अश्विन तारापुरे, अमोल बेलोकार, साहित्यिक तथा संपादक पंजाबराव वर, अ‍ॅड. एम.एस. इंगळे, दिपक ताजणे,साहित्यिक घुगे बंधू यांचेसह वकील मंडळींची उपस्थिती होती.

    Post Views:  166


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

संपादकिय

सर्व

Failed to connect to MySQL: Operation not permitted