गौपालक नारायण राठोड अनंतात विलीन
भाविकांची व गावकर्यांची उसंडली गर्दी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
08 Dec 2022, 5:02 PM
कापशी रोड येथील वयवृध्द सदैव जनतेच्या सुखादुखा साथीला असलेले गौपालक तसेच आमच्या गावकऱ्यांचे नारायण गायकीआबा राठोड नेहमीची हालाकीची परिस्थिती गुर्हे ढोर चारुन आपल्या संसाराचा गाडा ओढत चालविला त्यांना लहानपणापासूनच गुर्हे ढोर जनावरांचा जोपासण्याचा व भाजनाचा छंद होता ते जय भोलेनाथ व सोपीनाथ महाराजांचे भक्त आणि ते नेहमी गावामध्ये कोणी लहान बाळ असो किंवा मोठ बाईमाणुस असो कोणीही भेदारल की आलीच गायकीआबांची आढवण की चालले गायकीआबांच्या घरी की जय भोले व सोपीनाथ महाराज यांचे नाव घेऊन दिलाच आबांनी पाण्याचा छपका की कितीही भेदारेल असेना माणुस की एका इच्यात टणाण झाला.
अनेकांचे प्रामाणिकपणे काम करुन दिले कोणालाही काही मदत लागो की आबा तयार आहेतच नागपंचमी आली की आबांचा तालच वेगळा राहे की कधी नागोबाला नैवैध देतो आणि कधी सोपीनाथ महाराजांच्या मंदिरात ठावा म्हणायला जातो असो होत जाय एक बार का ठाव्यात बसले की मग पहा की बार्या वर बार्या की मंदिरासह संपूर्ण फाटा कसा गजबजून जाये.
गायकी आबा लहान मुलांना ही कधीही आरेतुरे बोलले नाही असेच नारायण डेबाजी राठोड गायकी आबाजी यांचे वयाच्या ८५ वर्षाचे असताना ७डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता वृध्दपकाळाने निधन झाले त्याच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुल दोन सुना नातवंड असा बराच आप्त परिवार आहे गायकी आबांच्या पुण्य आत्मास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो व त्यांच्या कुटुंबीयांनी या दुखातून सावरण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवा.
Post Views: 231