गरीब मराठ्याचा लढा हा माझ्या माहितीप्रमाणे गेली 35 वर्षे चाललेला आहे. पण इथल्या श्रीमंत मराठ्याने त्याला कधीही स्वरुप आणि आकार दिलेला नाही. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने एक स्वरुपही आलं आणि एक आकारही आला. त्याचबरोबर एक स्पेसिफिक मागणी ही सुद्धा पुढे आहे, ज्याला समाजामध्ये सहानुभूती असणारी परिस्थिती आहे. तेव्हा गरीब मराठ्याच्या आरक्षणाचं वेगळं ताट निर्माण करायचं असेल तर जरांगे पाटील यांनी आंदोलनाबरोबरच राजकीय भूमिका घेतली पाहिजे आणि लोकसभेबाबत त्यांनी भूमिका घेतली पाहिजे, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं.
या गरीब मराठ्यांचा आवाज, जो आज जरांगे पाटील रस्त्यावर उभा करत आहेत तो उद्याच्या लोकसभेमध्ये सुद्धा गेला पाहिजे. तिथेही प्रतिनिधी गेला पाहिजे. त्यांचं आंदोलन चालू असताना ते या दृष्टीने सुद्धा विचार करतील, त्यांचे सहकारी विचार करतील आणि योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडी करत आहे”, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी थेटपणे मनोज जरांगे पाटील यांना राजकारणात एन्ट्री करण्याचं आवाहन केलं आहे. आंबेडकर यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मनोज जरांगे यांनी विचार केला आणि त्यांनी खंरच राजकारणात एन्ट्री केली तर आगामी लोकसभा निवडणुकीत अतिशय वेगळं चित्र बघायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनोज जरांगे आता खरंच राजकारणात एन्ट्री मारतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Post Views: 197
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay