अवयवदान : श्रेष्ठतम दान !
पत्रकार स्वप्निल देशमुख यांचा मरणोत्तर अवयव दानाचा संकल्प
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
16 Oct 2023, 8:19 PM
अकोला - निसर्गाने मानवाला अवयवांच्या रूपात अनेक मौल्यवान गोष्टी अगदी नि:शुल्कपणे भेट दिल्या आहेत. मात्र मृत्यूनंतर जाळून किंवा पुरून हे अनमोल अवयव नष्ट केले जातात. त्यापेक्षा ते अवयव दान करून आपल्या शरीरातील ही निसर्गाची भेट इतरांना दिली तर अवयवांची प्रतीक्षा करणाऱ्या अनेकांचे प्राण वाचविले जाऊ शकतात. मृत्यूनंतरही अवयवांच्या रूपात इतरांमध्ये जिवंत राहिले जाऊ शकते. हा विचार स्वत: अवयवदानाची शपथ घेऊन बुलढाणा जिल्ह्यातील वानखेड,संग्रामपूर येथील स्वप्निल देशमुख आपल्या मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. पत्रकार स्वप्निल देशमुख यांनी केलेला हा उदात्त मानवसेवी संकल्प समाजातील अनेकांना अंतस्थ प्रेरणा देणारा ठरू शकतो.
Notto राष्ट्रीय अंग और ऊतक प्रत्यारोपण संगठनच्या माध्यमातून मेंदूमृत अवस्थेत नेत्रदान, अवयवदान आणि मरणोत्तर देहदानाचे स्वेच्छापत्र त्यांनी भरून दिले आहे. शरीरातील मौल्यवान अवयव हे निसर्गाने मोफत दिलेली भेट आहे. त्यामुळे ही भेट आपण फार तर शेअर किंवा अर्पण करू शकतो, मेंदूमृत झालेली व्यक्ती फार तर दोन-चार दिवस जगू शकते व मृत्यू अटळ आहे. त्यावेळी त्याच्या शरीराचे अवयव चांगल्या स्वरूपात असतात. अशावेळी कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतला तर गरजू व्यक्तींना फायदा होऊ शकतो. शरीरातील किडनी, यकृताचा भाग, हृदयाचे व्हॉल्व, आतडे, डोळे, स्कीन आदी आठ अवयव दान केले जाऊ शकतात. त्यामुळे इतर आठ व्यक्तींच्या शरीरात अवयवांच्या रूपात मृत व्यक्ती जिवंत राहू शकते. या उदात्त भावनेतू अवयवदानाची संस्कृती रुजविण्याच्या प्रेरणा निर्माण व्हाव्यात व आपल्या शरीराचे अवयव इतरांच्या कामात पडावे या मानवतावादी विचारातून आपण हा निर्णय घेतल्याचे मत स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले. आहे. भारतात लोक अवयव घेण्यासाठी उत्सुक असतात, मात्र देण्यासाठी समाजातील लोक तयार नसतात. त्यामुळे देशात अवयवांची गरज मोठी असते.अशावेळी माणसांनी ईतर माणसांना नवे जीवन देण्यासाठी तत्पर असले पाहिजेत अशा भावना स्वप्निल देशमुख व्यक्त केल्या आहेत.त्यांच्या अभिनव मानवसेवी उपक्रमाबध्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन आणि कौतूक होत आहे.
Post Views: 141