अकोला,दि.3 : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागात युवाकल्याण, सामाजिक व ग्रामीण विकासांकरीता उत्कृष्ट कार्य करणाऱ्या युवा संस्थासाठी जिल्हातील युवा मंडळाना जिल्हा युवा पुरस्कार दिला जातो. त्यासाठी दि.२० पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा युवा अधिकारी महेशसिंह शेखावत यांनी कळविले आहे.
पुरस्काराकरीता युवा मंडळाची निवड करताना एप्रिल 2020 ते मार्च 2021 कालावधीतील कार्याचा विचार केला जाईल. जिल्हास्तरावर निवड झालेल्या संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार निवडीसाठी पाठविण्यात येईल. तसेच राज्यस्तरीय निवड झालेल्या संस्थेचा प्रस्ताव राष्ट्रीयस्तरावर निवडीसाठी पात्र राहील. जिल्हास्तरीय पुरस्कार 25 हजार रुपये व प्रमाणपत्र, राज्यस्तरीय विजेता संस्थेस 75 हजार रुपये व प्रमाणपत्र तर राष्ट्रीयस्तर विजेता संस्थेस प्रथम विजेता तीन लक्ष रुपये, व्दितीय एक लक्ष रुपये व तृतीय 50 हजार रुपये व मानपत्र प्रदान करण्यात येईल. मंडळांच्या पदाधिकारी यांचे वय दि.31 मार्च 2021 ला 29 च्या आत असावे, मागील दोन वर्षात मंडळाने जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त केलेला नसावा. तसेच मंडळ नेहरू युवा केंद्राशी संलग्न व सन 2020-21 चा ऑडिट रिपोर्ट असणे बंधनकारक राहील.
पुरस्काराकरीत आवेदन करणाऱ्या युवा मंडळांनी नमुना अर्ज प्राप्त करण्यासाठी नेहरू युवा केंद्र वसंत देसाई स्टेडियम, दुसरा माळा, अकोला येथे सोमवार दि. 13 डिसेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष संपर्क करावा. पूर्ण भरलेले आवेदनपत्र, संस्था आणि नोंदणी पत्र, घटना, वार्षिक अहवाल, फोटो, बातमी, अंकेक्षण रिपोर्ट व अन्य आवश्यक कागद पत्रासह सोमवार दि. 20 डिसेंबरपर्यंत सादर करावा. जिल्ह्यातील युवक मंडळांनी युवा पुरस्काराकरीता जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन युवा समन्वयक महेश सिंह शेखावत यांनी केले आहे.
Post Views: 189
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay