वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना अकोला शिवसेना कार्यालयात स्मृतीदिनी अभिवादन!
अकोला - हिंदुहृदयसम्राट वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांना १४ व्या स्मृतीदिनी अकोला येथील नेहरू पार्क चौकातील शिवसेना कार्यालयात पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
दि.१७ नोव्हेंबर २०२६ रोजी स्व.बाळासाहेबांचा १४ वा स्मृतीदिन होता. याप्रसंगी बाळासाहेबांच्या अविरत संपर्कात राहिलेले शिवसेनेचे अकोला जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते श्रीरंग दादा पिंजरकर यांचे प्रमुख उपस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.स्व.बाळासाहेबांना भावपूर्ण वंदन, अभिवादन करून "बाळासाहेब अमर रहे,अमर रहे" च्या घोषणा दिल्यात. त्यांच्या स्मृती जागृत करत त्यांना वंदन केले.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते श्रीरंगदादा पिंजरकर यांचेसह,उपजिल्हाप्रमुख गोपाल म्हैसने, ज्येष्ठ पत्रकार संजय एम.देशमुख,जिल्हा सचिव सतिश गोपनारायण,तालूका प्रमुख विजय वानखडे,प्रकाश गिते,बाळू बागडे, सरचिटणीस दशरथ बायस्कर, उपतालूकाप्रमुख उमेश दुर्गे,तालूका संघटक आकाश वक्टे,उपशहर प्रमुख स्वप्निल देशमुख,सागर कुटे,माजी प्रसिध्दी प्रमुख अमोल खुळे, अनंता चोपडे,शुभम् गाडगे, व अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती.
Post Views: 6