ओबीसी मोर्चाच्या भाजप महाराष्ट्र उपाध्यक्षपदी डॉ.योगेश साहू यांची नियुक्ती
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
27 Oct 2023, 6:48 PM
अकोला - भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्ष पदावर अकोल्यातील सुप्रसिध्द दंत शल्य चिकित्सक भाजपचे 30 वर्षापासूनचे निष्ठावंत कार्यकर्ते डॉ योगेश साहू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांचे नेर्तृत्वात भाजपचे महाराष्ट्रात गतिमान संघटन आणि विकासकार्य सुरू आहे. पंतप्रधान मा. नरेन्द्रजी मोदींनी विश्वकर्मा योजना सुरू करून त्या माध्यमातून महाराष्ट्राला 18 हजार कोटींचा निधी दिलेला आहे. त्या निधीचे योग्य वितरण आणि त्याचा लाभ जास्तीत जास्त समाजबांधवांना झाला पाहिजे ही पक्षाची भूमिका आहे.
डॉ .साहू यापूर्वी अगोदरही वैद्यकीय आघाडी व महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य अकोला पश्चिम या पदांवर काम केलेले आहे व कार्यरत आहेत. या ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून डॉ. योगेश साहू यांची निवड माननीय श्री बावनकुळे साहेब यांनी व आमदार आशिष जी देशमुख व श्री संजय जी गाते यांनी केली आहे. डॉ.साहू हे भारतातला पहिले तंबाखू प्रतिबंधात्मक केंद्र आपल्या दवाखान्यात निशुल्क चालवतात ,तसेच त्यांची श्री गजानन महाराज संस्थान शेगाव येथील रूग्णसेवेतही ते कार्यरत असूनहलोकसेवा संघ या सामाजिक संघटनेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष,तसेच इंडियन डेंटल असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्ष पद त्यांनी भूषविले आहे.सध्या ते इंडियन डेंटल असोसिएशनचे सल्लागार आहेत .
भारताच्या लोकसंख्येत ओबीसींचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये वेगवेगळ्याएकून 5013 जातींचा समावेश आहे. हे प्राबल्य लक्षात घेऊनच निवडणूकीची दिशा ठरवून उमेदवारी दिली जाते. त्यामुळे योगेश साहू राज्य उपाध्यक्ष पदावरील निवड ही महत्वपूर्ण मानली जाते.त्याच्या निवडीबद्दल त्यांच्या असंख्य स्नेहीजण आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
Post Views: 124