विहिरीत असलेल्या ईसमाचा मृतदेह संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध पथकाने बाहेर काढला
संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाच्या टीमची धाडसी पराकाष्ठा
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
10 Apr 2024, 10:52 AM
बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या अकोला मलकापूर येवता ते कातखेड रोडला लागुनच असलेल्या शेतातील विहिरीत एका अनोळखी ईसमाचा मृतदेह तरंगताना असल्याची माहीती बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पिआय शिरीष खंडारे साहेब यांना मिळताच यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दीपक सदाफळे यांना माहीती देऊन सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयूर सळेदार,ऋषिकेश राखोंडे, सार्थक वानखडे,प्रज्वल वानखडे,यांचेसह शोध व बचाव साहित्य घेऊन आपात्कालीन वाहणासह एका तासात घटनास्थळावर पोहचले लगेच सिन ट्रेस केला असता 30 फुट खोल आणी 15 फुट पाणी असल्याचे दिसून आले. मृतदेह कुंजलेल्या अवस्थेत दिसून येत होता अतिशय दुर्गंधी आणी त्यात पाऊस चालु अशात हा मृतदेह जसाच्या तसा बाहेर काढणे जिगरीचेच काम होते यावेळी लगेचच सर्च ऑपरेशन चालु केले असता मोठ्या अथक प्रयत्नाने शिताफीने शेवटी आज 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढला यावेळी मृतक हा अनोळखी असल्याने त्याचे नाव पता नाव मिळवून आला नसुन पोलीसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी आव्हान केले आहे घटनास्थळावर मदती करीता बार्शीटाकळी पोलीस ठाण्याचे पिआय शिरीष खंडारे सर,एसआय विजय इंगळे साहेब,हे.काॅ. नागसेन वानखडे साहेब, हे.काॅ. अनिल सांगळे साहेब, हे.काॅ.मंगेश महाजन साहेब, पो.काॅ.अनिकेत चव्हाण साहेब हे हजर होते अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
Post Views: 168