अकोट: तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय खेळ व क्रीडा स्पर्धेमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या जिल्हा परिषद शाळा खैरखेड येथील मुलांनी एन.एम.एम.एस.परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामध्ये जिल्हा परिषद शाळा खैरखेड येथील वर्ग आठवीच्या कु. शिवानी अनिल डोबाळे कु.गार्गी अमोल खोब्रागडे या दोन विद्यार्थिनी यशाची परंपरा कायम ठेवत सलग पाचव्या वर्षीही विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या आहेत.व जिल्हा परिषद शाळा खैरखेडच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
जिल्हा परिषद शाळेच्या या यशाबद्दल अडगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री निशिकांत भुरे सर यांनी कौतुकपर भेट देऊन या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व उत्तीर्ण झालेल्या या दोन विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या यशाचे शिल्पकार श्री.विजय हरणे सर यांच्या सुद्धा सत्कार करण्यात आला. दर रविवारी हरणे सरांनी विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा आयोजित केली होती. हे विशेष
याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी आगामी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यापेक्षाही अधिक मेहनत करून यश मिळवावे असे मत श्री निशिकांत भुरे सर यांनी व्यक्त केले. सत्कार प्रसंगी बोलताना श्री विजय हरणे सर यांनी अधिक पुस्तक वाचन करून यशाचा कानमंत्र स्वीकारावा असे सर्व विद्यार्थ्यांना आवाहन केले.
याप्रसंगी इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शशिकांत भड सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री संदीप कुलट सर यांनी केले.या कार्यक्रमाचे यशस्वीते करिता शाळेचे मुख्याध्यापक श्री रघुनाथ माळवे सर व श्री सागर तळोकार सर यांनी प्रयत्न केले.
Post Views: 130