अनैतिक मानवी वाहतुककडून हिवरखेड येथील महिला बेपत्ता प्रकरणाचा शोध


मे महिन्यात 33 गुन्हे व 21 बेपत्तांसह 54 प्रकरणाचा तपास
 संजय देशमुख  02 Jul 2022, 2:11 PM
   

अकोला : अनैतिक मानवी वाहतुक विभागाच्या पोलिसांकडून हिवरखेड येथील बेपत्ता महिलेचा मध्यप्रदेशातून शोध घेण्यात आला असून गेल्या मे महिन्यात एकंदर 54 प्रकरणांचा तपास करण्यात आला. यामध्ये 33 गुन्हे आणि 21 बेपत्ता प्रकरणांचा समावेश आहे. 
अकोला जिल्ह्यात पोलिस स्टेशन हिवरखेड मधील नोंद झालेल्या प्रकरणातील पिडीत महिलेचा पोलिसांनी ग्राम खोद्री ता. खकनार जि. बर्‍हाणपूर येथुन शोध घेतला. गुप्त बातमीदार माहितीवरून मध्य प्रदेशात जाऊन हा तपास करण्यात आला. पिडीत महिला व आरोपीला पुढील तपासासाठी हिवरखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी भादवी कल 363, 366 अ नुसार कार्यवाही करण्यात आली. 
पोलिस अधीक्षक जी.श्रीधर सहा. अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय खंदाडे, सह. पो.नि. महेश गावंडे, पो. उप. नि. सुकेशनी जमधाडे, पो.उप. नि. विजय खर्चे, पो.हे.कॉ. सुरज मंगरुळकर, धनराज चव्हाण, आशिष अघडते, पुनम बचे, करिश्मा गावंडे यांनी ही कार्यवाही केली. इतर गुन्ह्यांमध्ये पिडीत मुली व आरोपींचा तपासाचे काम सुद्धा तत्परतेने सुरू आहे. 

    Post Views:  159


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व