डॉ. प्रीती कामावीसदार यांची भाजप महिला मोर्चाचे जिल्हा ग्रामीण सचिव पदी नियुक्ती
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
16 Sep 2026, 3:11 PM
अकोला : ज्येष्ठ समाजसेविका तथा शिक्षण तज्ञ डॉ. प्रीती विपिन कामाविसदार यांची भारतीय जनता पार्टी च्या अकोला जिल्हा ग्रामीण महिला मोर्चाचे सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप कार्यालयात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, महापौर शारदा ताई खेडकर,यांचे हस्ते त्यांना हे नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल, भाजपाचे शहर अध्यक्ष जयंतराव मसने, जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, माजी आमदार बळीराम सिरस्कार, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ज्योती पुंडकर यांचे सह इतरही नेतेमंडळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मानसशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या डॉ. प्रीती या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्यात अग्रेसर आहेत. " यशदा " बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविलेला आहे. " अमृत कलश " विद्यालयात 12 वर्षे त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून उत्तम कार्य केलेले आहे. त्यांच्या या नियुक्ती कार्यक्रमात भाजपाचे उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे, बुद्धिवादी भाजपा सेलचे संयोजक प्रदीप खाडे, ऍड. देवाशिष काकड, माधव मानकर, अंबादास मोहिते, संजय गोटफोडे डॉ. किशोर मालोकार, सिद्धार्थ शर्मा यांचे सह नगरसेवक, तालुका व जिल्हा पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते. डॉ. प्रीती कामाविसदार यांच्या या नियुक्तीबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे अभिनंदन केले आहे
Post Views: 1