महीलाचां सर्वांगीण विकास करण्यासाठी शासकीय सर्व योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी महीला आर्थिक विकास महामंडळ अकोला कटिबद्ध - निताताई अंभोरे
व्याळा... दि. 28/9/2026 रोजी तिर्थक्षेत्र व्याळेश्वर संस्थान व्याळा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्वयम समर्थन लोकसंचालित साधन केंद्र उरळ यांची वार्षिक सर्वसाधारण सभा ही व्याळा गावात आयोजित करण्यात आली होती यामध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रामुख्याने माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. संध्याताई जयंत खंडारे व कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून गजानन दांडगे अध्यक्ष युवा प्रेरक प्रतिष्ठान तर प्रमुख पाहुणे म्हणून पुरूषोत्तम मांगटे पाटील सभापती सेवा सहकारी सोसायटी, सौ. शारदाताई सोनटक्के माजी सभापती बाळापूर अनिल गिरे पत्रकार , नारायण मानकर अध्यक्ष स्वामी विवेकानंद काॅन्व्हेट व्याळा, शेषराव मराठे, शिवदास सावरकर ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सचिन कुचर , दिलीप माने, हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे. सा.सहनियत्रन अधिकारी कुंदन सदाशिव, ADCC बॅकेच्या व्यवस्थापक भावना तायडे HDFC बॅकेचे व्यवस्थापक आनंद वानखडे RGB पुजा कुचर उपस्थित होते तसेच MRC संचालक मंडळ आणि प्रत्येक गावातून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिता इंगळे यांनी केले प्रस्तावीक CMRC व्यवस्थापक कल्पना गवई यांनी केले MRC कृती आराखडा महिलांसमोर मांडण्यात आला महत्त्वाच्या विषयावर ठराव घेण्यात आले तसेच उद्योग व्यवसाय बद्दल मार्गदर्शन केले जास्तीत जास्त महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योग व्यवसायासाठी कशाप्रकारे वाटचाल केली पाहिजे हे सुद्धा महिलांना समजून सांगण्यात आले. महीलाचां सर्वांगीण विकास करण्यासाठी शासकीय सर्व योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी महीला आर्थिक विकास महामंडळ अकोला कटिबद्ध राहील असे निताताई अंभोरे यांनी आश्वासित केले. यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला सन्मान चिन्ह देउन गौरविण्यात आले. पर्यावरण संतुलित राखण्यासाठी सर्व पाहुणे यांना एक एक वृक्ष देण्यात आले या कार्यक्रमातील व्याळा, अंदुरा, देगांव, निमकर्दा , यासह अठरा गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्याकरता व्याळा येथील महिलांनी परिश्रम घेतले
कमल सिरसाट सुचिता भगत LC सुनिता दामोदर पद्मिनी दामोदर संजीवनी दामोदर पद्माताई गवई पूजा गायकवाड सर्वांच्या अथक परिश्रमातून कार्यक्रम यशस्वी पार पडला तर अनिता इंगळे यांनी सर्व चे आभार व्यक्त केले
Post Views: 1