मुंबई : महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. तर सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरण्याची शक्यता आहेत. दरम्यान, रजनीश सेठ यांनी व्हीआरएस घेऊन नवी जबाबदारी स्वीकारली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. सेठ हे येत्या डिसेंबरमध्ये रिटायर होणार होते. त्याआधी त्यांची एमपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा फोन टॅप करुन त्यांच्या संभाषणाची माहिती देवेंद्र फडणीस यांना दिल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पुण्यात पोलीस आयुक्त असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी कोर्टात रश्मी शुक्ला यांनी भूमिका मांडल्यानंतर कोर्टाने हे दोन्ही गुन्हे रद्दबातल ठरवले होते. याशिवाय सायबर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्हे प्रकरणातही सर्व कारवाई थांबवण्यात आली होती. त्यानंतर शुक्ला यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Post Views: 183
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay