अकोला : अकोला शहरात अनेक कॅफेंवर मुला मुलींना बसण्यासाठी अतिरिक्त सोय सुविधा पुरवल्या जात असल्याचा प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे. अनेक कॅफेंवर अल्पवयीन मुला मुलींचे अश्लील चाळे चालत असल्याच्या तक्रारी आमदार नितीन देशमुख यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. आमदार देशमुखांनी आज दुपारच्या सुमारास जवाहर नगर भागातील कॅफेंवर अचानक भेट देत तपासणी केली. या दरम्यान अल्पवयीन मुलं-मुली अश्लील चाळे करत असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार अत्यंत भयंकर अन् खाली मान खालायला लावणारा होता, या संदर्भात आमदार देशमुख यांनी महापालिका आयुक्त तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनाही कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारवर ताशेरेही ओढले.
अकोला शहरातील जवाहर नगर भागात १५ ते २० कॅफे आहेत, त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना कसे आकर्षित करतील यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. अनेक कॅफे व्यावसायिकांनी ग्राहकांसाठी अतिरिक्त सोयसुविधा पुरवल्या असल्याचं समोर आलं आहे. कॅफे चालक हे ग्राहकांकडून दोन ते तीन हजार रुपये अतिरिक्त घेऊन, त्यांना स्पेशल कॅबिन ज्याला पडदे लावलेले असतात. त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे नाही, अशा ठिकाणी अल्पवयीन मुलं- मुलींसह तरुणाई मोठ्या प्रमाणात जाते. या प्रकारला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांनी महिलांनी आमदार नितीन देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत तक्रारी मांडल्या. महिन्याभरापूर्वी शिवसेनेच्या महिला आघाडीने कॅफे विरोधात आक्रमक भूमिका घेत पोलिसांसह कारवाई केली होती. त्यानंतर पुन्हा हे प्रकार सुरू झाले. हे प्रकार रोखण्यासाठी आज शिवसेना आमदार नितीन देशमुख रस्त्यावर उतरले.
Post Views: 312
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay