सकाळची पहिली पावलेच देतात टाचदुखीचा इशारा!
टाचेत टोचणारी वेदना? प्लांटर फॅसिआयटिसकडे दुर्लक्ष करू नका - डॉ. नितीश अग्रवाल
खामगाव : सकाळी झोपेतून उठल्यानंतर पहिल्यांदा पाय जमिनीवर ठेवताच टाचेत तीव्र वेदना जाणवणे, काही पावले चालल्यानंतर वेदना कमी होणे आणि पुन्हा बराच वेळ बसल्यानंतर उठताना टाच दुखणे—ही लक्षणे अनेकदा प्लांटर फॅसिआयटिस (Plantar Fasciitis) या समस्येशी संबंधित असू शकतात. टाचदुखी ही सामान्य तक्रार असली तरी सतत होणाऱ्या वेदनेकडे दुर्लक्ष केल्यास दैनंदिन हालचालींवर परिणाम होऊ शकतो.
???? प्लांटर फॅसिआयटिस म्हणजे नेमके काय?
पायाच्या तळव्यामध्ये टाचेच्या हाडापासून बोटांच्या दिशेने जाणारी एक मजबूत ऊती असते, तिला (Plantar Fascia) प्लांटर फेशिया म्हणतात. चालताना आणि धावताना ही ऊती पायाच्या कमानीला आधार देण्याचे काम करते.
या ऊतीवर वारंवार ताण येणे, अतिवापर किंवा पायावर अतिरिक्त भार पडणे यामुळे त्यामध्ये चिडचिड, सूज आणि वेदना निर्माण होऊ शकतात. या स्थितीला प्लांटर फॅसिआयटिस म्हणतात.
???? सकाळीच टाच का दुखते?
रात्री झोपताना पायाची हालचाल कमी असल्यामुळे प्लांटर फेशिया (Plantar Fascia) काही प्रमाणात आकुंचन पावते. सकाळी अचानक उभे राहून पायावर वजन टाकल्यावर या ऊतीवर ताण येतो आणि पहिल्या काही पावलांमध्ये तीव्र वेदना जाणवू शकतात.
काही वेळ चालल्यानंतर ऊतींची हालचाल वाढल्याने वेदना काही प्रमाणात कमी होऊ शकतात. मात्र बराच वेळ बसल्यानंतर पुन्हा उठताना त्याच प्रकारचा त्रास जाणवू शकतो.
⚠️ कोणाला जास्त धोका?
* वाढलेले वजन — पायाच्या तळव्यावर अतिरिक्त भार पडतो.
* दीर्घकाळ उभे राहणे — शिक्षक, दुकानदार, कारखाना कामगार किंवा इतर उभे राहून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये त्रास होऊ शकतो.
* धावणे/व्यायाम — अचानक व्यायामाचे प्रमाण वाढल्यास ताण वाढू शकतो.
* चुकीचे पादत्राणे — योग्य आधार नसलेले किंवा खूप कडक पादत्राणे त्रास वाढवू शकतात.
* पायाची रचना — Flat Foot सपाट पाय किंवा पायाच्या कमानीतील इतर बदलांमुळे काही व्यक्तींमध्ये धोका वाढू शकतो.
* दीर्घकाळ कठीण पृष्ठभागावर चालणे किंवा उभे राहणे.
???? प्रमुख लक्षणे
सकाळच्या पहिल्या पावलांमध्ये टाचेत तीव्र वेदना,
बराच वेळ बसल्यानंतर उठताना टाच दुखणे,
टाचेच्या खाली किंवा पायाच्या तळव्यामध्ये टोचल्यासारखी वेदना,
दीर्घकाळ उभे राहिल्यानंतर वेदना वाढणे,
चालताना किंवा धावताना त्रास,
काही वेळा टाचेच्या विशिष्ट भागावर दाब दिल्यावर वेदना जाणवणे.
❌ टाचदुखी म्हणजे नेहमीच "हिल स्पर" (Heel Spur) असते का?
नाही. टाचदुखीची अनेक कारणे असू शकतात. काही रुग्णांमध्ये एक्स-रे मध्ये वाढलेले हाड (heel spur) दिसू शकतो, परंतु spur दिसणे म्हणजे तोच वेदनेचे कारण आहे असे नेहमीच नसते. योग्य निदानासाठी रुग्णाची लक्षणे, तपासणी आणि गरजेनुसार इतर तपासण्या महत्त्वाच्या असतात.
????️ टाचदुखी टाळण्यासाठी काय करावे?
✔️ वजन योग्य मर्यादेत ठेवण्याचा प्रयत्न करा.
✔️ योग्य कुशनिंग आणि आर्च सपोर्ट असलेली पादत्राणे वापरा.
✔️ अचानक धावणे किंवा व्यायामाचे प्रमाण वाढवू नका.
✔️ डॉक्टर/फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने स्नायू calf आणि plantar fascia stretching करा.
✔️ दीर्घकाळ अनवाणी कठीण जमिनीवर चालणे टाळा.
✔️ सतत टाचदुखी असल्यास स्वतःहून दीर्घकाळ औषधे घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
????⚕️ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल
MS Ortho, FAS, FARS (Australia)
अस्थिरोग विशेषज्ञ
अग्रवाल हॉस्पिटल, जलंब रोड, गोकुळ नगर, खामगाव
???? 8605779989
“टाचदुखी सहन करत राहू नका—कारण ओळखा, योग्य उपचार घ्या आणि पुन्हा आरामाने चला!”
Post Views: 1