फिट अकोला मॅरेथॉन स्पर्धेत एल. आर. टी. च्या एन. सी. सी. कडेट्सचा उत्स्फूर्त सहभाग


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  12 Mar 2024, 10:18 AM
   

जिल्हा प्रशासनाकडून आयोजित पहिली फिट अकोला मॅरेथॉन रविवार दिनांक १० मार्च रोजी उत्साहात पार पडली. या मॅरेथॉन मध्ये मोठ्या संख्येने धावपटूंनी सहभाग घेतला. वसंत देसाई स्टेडियम येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली. प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर, जिल्हाधिकारी अजित कुंभार, रेस डायरेक्टर डॉ. राजेंद्रकुमार सोनोने यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला.  यामध्ये एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालयाच्या ३० एन. सी. सी. कडेट्सनी सहभाग घेऊन  मेडल प्राप्त केले. या स्पर्धेचे तीन भागात विभाजन केले होते. २१ कि. मी. यामध्ये कॅडेट प्रेम अहिराव, कॅडेट प्रविण सोळंकी यांनी गोल्ड मेडल तर १० कि. मी. मध्ये सार्जंट स्वराज बोदडे, कॉर्पोरल श्रीकांत वाडोकार, कॅडेट त्रिशब कोकाटे, कॅडेट यशवंत हरसुलकर, सार्जंट तनया नाफाडे, कॉर्पोरल नयना टोंगडे तसेच ५ कि. मी. मध्ये सीनियर अंडर ऑफिसर ऋषिकेश पटेल, जूनियर अंडर ऑफिसर सागर वानखडे, कॅडेट रोहन मुरादे, कॅडेट आयुष थोरात, कॅडेट गुणवंत गुजर, कॅडेट शुभम दुबे कॉर्पोरल धनश्री चव्हाण, कॅडेट यशस्वी खंडारे, कॅडेट कोमल मेश्राम, कॅडेट लीना काळे,  कॅडेट निशा अरुलकार, कॅडेट सानिका राजेदर, कॅडेट श्रद्धा पांडे, कॅडेट प्राची वरुडकार अश्या एकुण ३० कॅडेट्सनी सहभाग दर्शवला. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जी. जी. गोंडाणे, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. वाय. के. अग्रवाल, एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, डॉ. दिपाली बियाणी यांनी सहभागी एन. सी. सी. कॅडेटचे अभिनंदन केले. करून त्यांना शुभेच्छा दिल्यात. एन. सी. सी. कॅडेटचा उत्साह, प्रतिसाद व तरुणाईचा जल्लोष पाहून ११ महाराष्ट्र बटालियन अकोल्याचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची यांनी कडेट्सला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

    Post Views:  357


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व