संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका


बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय
 संजय देशमुख  05 Jan 2022, 6:43 PM
   

संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका माणला जातोय. तर कामगार न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी महामंडळचं मनोबल वाढलं असल्याचं ही बोललं जात आहे.
औरंगाबाद : गेल्या महिनाभरापेक्षा अधिक काळ सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप अजूनही सुरूच आहे. मात्र संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात येत असल्याने लातूर आणि यवतमाळ येथील काही कामगारांनी कामगार न्यायालयात धाव घेतली होती. पण यावर निकाल देतांना कामगार न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना दणका दिला आहे. तर न्यायालयाच्या निकालाने एसटी महामंडळचं मनोबल वाढलं आहे.
विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून संपावर गेले आहेत. या काळात सरकारने अनेक प्रस्ताव दिल्यानंतर ही विलीनीकरण होईपर्यंत संप माघे घेणार नसल्याची भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे या काळात एसटी महामंडळकडून अनेक कर्मचाऱ्यांना बडतर्फाची कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. औरंगाबाद येथील १५ वाहक-चालकांनादेखील नोटीस देण्यात आली होती. दरम्यान, लातूर आणि यवतमाळ येथील कर्मचाऱ्यांनी कामगार न्यायालयात धाव घेत, बडतर्फाची कारवाईला स्थगिती देण्याची विनंती केली होती.
यावर निकाल देत कामगार न्यायालयाने तक्रादार एसटी कर्मचाऱ्यांना चपराक लावत दणका दिला आहे. तर बडतर्फाच्या कारवाईला स्थगिती देण्यास कामगार न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा झटका माणला जातोय. तर कामगार न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर एसटी महामंडळचं मनोबल वाढलं असल्याचं ही बोललं जात आहे.

    Post Views:  361


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख