पेनकिलर गोळ्यांच्या अतिवापराने एक लाख मृत्यू


लॉकडाऊन काळात अमेरिकेतील वास्तव, ‘सीडीसी’ या संस्थेने दिलेली माहिती
 Sanjay M. Deshmukh  26 Nov 2021, 1:27 PM
   

वॉशिंग्टन, 26 नोव्हेंबर : लॉकडाउन काळात कोरोनापासून बचावासाठी अमेरिकेत वेदनाशामक गोळ्यांचा (पेनकिलर) बेछूट वापर झाला. त्याच्या अतिवापरामुळे तेथे एक लाख नागरिक मरण पावले आहेत. मे 2020 ते एप्रिल 2021 या काळातील ही संख्या असल्याची माहिती ’सीडीसी’ या संस्थेने दिली आहे.
औषधांच्या ओव्हरडोसमुळे होणार्‍या मृत्यूंची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तीसपट वाढली असून, गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट झाल्याचे या संस्थेने नमूद केले आहे. औषधांचा असा ओव्हरडोस म्हणजे कोरोना काळातील साइड इफेक्ट्स असल्याचे मानले जाते. कोरोनामुळे अमेरिकेत आतापर्यंत पावणेआठ लाख लोक मृत्युमुखी पडले असून, मे 2020 ते एप्रिल 2021 या काळात सुमारे एक लाख लोक मरण पावले. ’सीडीसी’ने दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या एक लाखांपेकी 64 हजार लोक ’फेन्टेनिल’ या सिन्थेटिक पेनकिलरमुळे मरण पावले आहेत. महामारीच्या काळात लोकांनी पेनकिलरचा अतिवापर केल्यामुळे हे घडल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ड्रग अ‍ॅब्यूजच्या संचालिका डॉ. नोरा वोलकॉव्ह यांनी दिली. 
सत्तर टक्क्यांचे वय 25 ते 54 वर्षे 
औषधाचा ओव्हरडोस राष्ट्रीय आपत्तीप्रमाणे असल्याचे मत ड्रग अ‍ॅडमिनस्ट्रेटर अ‍ॅनी मिलग्रेम यांनी व्यक्त केले. 33 कोटी लोक मरण पावतील एवढे सुरक्षा संस्थांनी पकडलेल्या ’फेन्टेनिल’चे प्रमाण असल्याची माहिती त्यांनी दिली. खोट्या प्रिस्क्रिप्शनद्वारे ऑनलाइन आणि सोशल मीडियावर औषधांची विक्री केली जाते. ’डीईए’ने गेल्या दोन महिन्यांत यासंदर्भात 800 जणांना अटक करून ’फेन्टानिल’च्या 18 लाख गोळ्या जप्त केल्या आहेत. कॅरोलिना राज्यातील दीड वर्षाच्य बालिकेचा मृत्यू या वेदनाशामकामुक झाला. आता तिच्या पालकांवर खटल सुरू आहे. लॉस एंजेलिसमध्ये एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे झाला.

    Post Views:  233


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व

अत्त दीप भव

४२ मिनेट