सामाजिक, राजकिय, आध्यात्मिक व प्रबोधन अश्या विविध क्षेत्रात कार्य करणारे माणिक अशोकराव शेळके यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक विचारमंथन सभेत सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
माणिक शेळके यांनी संत तुकाराम सामाजिक परिषद, श्री गुरुदेव सेवा मंडळ, नाम फाऊंडेशन, आधार फाऊंडेशन अश्या विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून सामाजीक व प्रबोधनाचे कार्य केले असून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आतापर्यंत अकोला जिल्ह्यात 160 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबाना 40 लक्ष रुपयाची मदत देण्यात आली याच बरोबर 75 विधवा व एकल महिलांना शिलाई मशीन वितरित करण्यात आल्या. त्यांच्या याच सेवाभावी कार्याची दखल घेऊन त्यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत म्हणून प्रभात किड्स चे संचालक श्री गजानन नारे, वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील, ऍड. नितीन धूत, प्रा. डॉ. संतोष हुशे, लोकस्वातंत्र पत्रकार महासंघाचे अध्यक्ष संजय देशमुख, पत्रकार संघटनेचे पदाधिकारी सतीश देशमुख, मोहन शेळके, राजाभाऊ देशमुख, राहुल राऊत, पंकज देशमुख, अंबादास तल्हार, गजानन थोरात, मनोहर मोहड आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.
Post Views: 200