एक चपाती जास्त खाल्ली म्हणून सुनेने सासुला केली मारहाण


व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  27 Apr 2022, 9:12 AM
   

हरयाणातील : सोनीपतमध्ये सासु सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील एका सुनेने सासुला एक पोळी जास्त खाल्ली म्हणून मारहाण केली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी सून मनिषा, तिची आई आणि भावाला अटक केली आहे.

ही घटना सोनीपत गावातील सांदल खुर्द येथील असल्याचं सांगितलं जात आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये सासू इशवंतीला तिची सून घराच्या बाहेर घेऊन जाते आणि तिला जबदरस्तीने काहीतरी विचारताना दिसत आहे. त्यानंतर सून सासूला मारहाण करताना दिसत आहे.

हा प्रकार नातवाने दिलेल्या चपातीवरुन झाला. विधवा इशवंती (७५) हिने सोनीप पोलिसांकडे मारहाणीबाबत तक्रार केली होती. यात तिने मुलगा मुकेशची पत्नी मनिषा ही छळ करीत असल्याचं सांगितलं. सून सकाळ-सायंकाळी दोन चपात्या देते. सूनेने पाच दिवसांपूर्वी दिलेल्या चपत्या खाल्ल्या होत्या. यानंतर नातू आणखी एक पोळी घेऊन आला. त्याने आग्रह केला म्हणून सासूने चपाती खाल्ली. ही बाब सूनेला कळताच ती सासूसोबत भांडू लागली. आणि तिला मारहाण केली.

सून मनिषाने पती मुकेश आणि अन्य सदस्यांवर हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. ती माहेरीच राहते. काही दिवसांपूर्वी ती सासरी आली होती. तर दुसरीकडे सासू इशवंतीने सुनेवर मारहाणीचा आरोप केला आहे. मुकेशने सांगितलं की, तो आणि त्याचा भाऊ आपल्या वृद्ध आईसोबत राहतात. ते स्वयंपाकही वेगळा करतात. मात्र तरीही पत्नीने वृद्ध आई आणि अन्य जणांचं जगणं अवघड केलं आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

    Post Views:  396


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व