वानखेड गावात शिरलेल्या हरिणीच्या पिल्लाला कुत्र्यांनी केले गतप्राण !


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  02 May 2024, 3:35 PM
   

वानखेड :संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये अचानक  महाराष्ट्र दिनी अंदाजे एक वर्ष  वयाचे हरीण  शिरले. त्या हरिणाचा  गावातील कुत्र्यांनी पाठलाग केला. त्याला पकडून चावा घेतला.या हल्ल्यात  हरीण जाग्यावरच निपचित पडले.  गावातील नागरिकांनी त्याच्यावर उपचार केला. 
        पत्रकार स्वप्निल देशमुख यांनी तात्काळ फॉरेस्ट डिपार्टमेंट जळगाव जामोद यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली.त्यानुसार  वरवट बकाल बीटच्या वनपालांनी  तात्काळ गाडी पाठवून वानखेड गावातील हरीणीच्या या पिल्लाला फॉरेस्ट ऑफिसला नेले. या गरीब पिल्लाला कुत्र्यांनी जखमी करून गतप्राण  केल्याबद्दल  वानखेड गावातील नागरिकांनी दुःख व्यक्त करीत पाहण्यासाठी गर्दी  केली.
       त्यानंतर वनविभाग कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांच्या साक्षीने त्याचा पंचनामा केला.  एकलारा बानोदाजवळील आरामशिनजवळ त्याला जाळण्यात आले. अशी माहिती सुनील एस सावळे वरवट बकाल बीट वनपाल यांनी दिली.

    Post Views:  103


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व