वनश्री पुरस्कार प्राप्त सौ. ज्योती रामदास कदम यांचा जामगे येथे भात लावणीत उत्स्फूर्त सहभाग... शेतकरी श्रमाला सलाम!


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2026-08-06
   

संतोष यशवंत बामणे
ठाणे : खेड...रत्नागिरी    कोकणची समृद्ध कृषी परंपरा, शेतकरी संस्कृती आणि मातीशी असलेले आत्मीय नाते जपत वनश्री पुरस्कार प्राप्त सौ. ज्योती रामदास कदम यांनी आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जामगे येथे शेतकरी महिलांसमवेत पारंपरिक भात लावणीत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
माजी पर्यावरण मंत्री मा. श्री. रामदास कदम यांच्या धर्मपत्नी, महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री मा. श्री. योगेश रामदास कदम तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश रामदास कदम यांच्या मातोश्री असलेल्या सौ. ज्योती कदम यांनी शेतकरी महिलांसोबत खांद्याला खांदा लावत चिखलात उतरून भाताची रोपे उपटण्यापासून ते प्रत्यक्ष लावणीपर्यंत प्रत्येक कामात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी त्यांनी उपस्थित शेतकरी भगिनींशी संवाद साधत त्यांच्या कष्टांना मानाचा मुजरा केला. ग्रामीण भागातील शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शेतकरी हा देशाचा अन्नदाता असून त्याच्या श्रमाचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सौ. ज्योती कदम यांच्या या साध्या, मनमिळाऊ आणि जमिनीशी नाळ जोडणाऱ्या सहभागामुळे शेतकरी महिला व ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यांच्या या कृतीतून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, शेतीप्रेम आणि कोकणच्या परंपरेप्रती असलेली निष्ठा पुन्हा एकदा अधोरेखित झाली. भात लावणीच्या निमित्ताने पारंपरिक कृषी संस्कृतीचे जतन, शेतकरी महिलांच्या श्रमांचा गौरव आणि शेतीविषयी समाजात सकारात्मक संदेश देण्याचे महत्त्व या उपक्रमातून अधोरेखित झाले.

    Post Views:  15


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व